शिवसैनिकांचा जल्लोष : खरे कोण, खोटे कोण? हे सिद्ध झाले

शिवसैनिकांचा जल्लोष : खरे कोण, खोटे कोण? हे सिद्ध झाले

अमरावती : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे जातप्रमाणपत्र उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. राजकमल चौक, सक्करसाथ, अंबागेट या परिसरात आतषबाजी करून शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय (The decision of the High Court is the victory of truth) असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख सुनील खराटे (District Chief Sunil Kharate) यांनी दिली. (Various-views-on-MP-Navneet-Rana's-caste-certificate)

खासदार नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा मुद्दा अनेक वर्षांपासून चर्चेत राहिला आहे. त्यानंतर तो न्यायालयात गेला. आता उच्च न्यायालयाने खासदार राणा यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय दिला. ही बातमी शहरात पसरताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. राजकमल चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील खराटे तसेच सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात ढोलताशांसह आतषबाजी करण्यात आली तर अनेक शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्यात.

शिवसैनिकांचा जल्लोष : खरे कोण, खोटे कोण? हे सिद्ध झाले
जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नवनीत राणा यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

अंबागेटच्या परिसरातसुद्धा शिवसैनिकांनी फटाके फोडले. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील खराटे, प्रकाश तेटू, रामा सोळंके, पप्पू मुणोत, गोविंद दायमा, प्रकाश मंजलवार, रूपेश आलेकर, दिगंबर मानकर, रमेश गुरमाळे, मनीष रामावत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रिया जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी दिली.

नवनीत राणा यांनी वेगवेगळ्या युक्त्या लढवून खोटे पुरावे सादर करून बचाव करण्याचा प्रयत्न केला. परंतु, न्यायालयाने सर्व पुरावे फेटाळून लावत महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायव्यवस्था ही केवळ सत्याच्या बाजूने उभी राहते, हे या निर्णयावरून सिद्ध झाल्याचे सुनील खराटे म्हणाले. न्यायालयाकडून देण्यात आलेला निर्णय हा सत्याचा विजय असून खरे कोण, खोटे कोण? हे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण हरमकर यांनी दिली.

(Various-views-on-MP-Navneet-Rana's-caste-certificate)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com