esakal | शेतातूनच भाजीपाला व फळांची होतेय विक्री
sakal

बोलून बातमी शोधा

bhajipala.jpg

भाजीपाला व फळांद्वारे होणाऱ्या कोरोना संक्रमनाला आळा बसत असून, ग्राहकांनाही त्याचे समाधान मिळत आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जास्तीचा असलेला भाजीपाला व फळांपासून योग्य तो मोबदला मिळण्यास अडचणी येत असल्याने या उभ्या बागायतींवर शेतकरी नाइलाजास्तव ट्रॅक्टर फिरवीत आहेत.

शेतातूनच भाजीपाला व फळांची होतेय विक्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदुरा (जि. बुलडाणा) : शेतकऱ्यांच्या आपल्या शेतात पिकविलेल्या भाजीपाला व फळांची विक्रीस सध्या थोड्याफार अडचणी येत असल्याने बाजारपेठेपेक्षा शेतातच माल विक्रीला ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. ग्राहकांनाही गुणवत्ता मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील मालाच्या खरेदीला पसंती दर्शविली आहे. त्यामुळे भाजीपाला व फळांद्वारे होणाऱ्या कोरोना संक्रमनाला आळा बसत असून, ग्राहकांनाही त्याचे समाधान मिळत आहे. असे असले तरी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जास्तीचा असलेला भाजीपाला व फळांपासून योग्य तो मोबदला मिळण्यास अडचणी येत असल्याने या उभ्या बागायतींवर शेतकरी नाइलाजास्तव ट्रॅक्टर फिरवीत आहेत.

क्लिक करा- बुलडाणा कोरोनामुक्तीकडे; मात्र, त्या दोन महिला या जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळल्याने वाढली चिंता

ग्राहकांना आहे भीती
सध्या लॉगडाउनमुळे जीवनावश्यक वस्तूत मोडणाऱ्या भाजीपाला व फळांच्या विक्रीला बंदी नसली तरी एकट्याचाच भाजीपाला घेऊन जाण्यासाठी वाहनाचा खर्च जास्त येत असल्याने या शेतकऱ्यांनी परिसरातील भाजीपाला विक्रेत्यांनी शेतातच खुल्या विक्रीचा पर्याय खुला केला असल्याने भाजीपाला विक्रेत्यांनी कुठून माल आणला असेल हे कळत नसल्याने ग्राहकच थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन भाजीपाला व फळे आपल्या हाताने खरेदी करत आहेत. कोरोना संक्रमणाच्या धास्तीने ग्रामिण भागातील जनता शहरातील भाजीपाला व फळांच्या खरेदीला शक्यतो नापसंती दर्शवत असल्याने शेतातील घेतलेल्या भाजीपाला व फळांना बऱ्यापैकी दिवस आले होते. परंतु, अधिक प्रमाणात असलेला हा भाजीपाला व फळे विकणे शक्य नसल्याने व त्यातूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी भाजीपाला वर्गीय पिके उपटून टाकत आहे.

हेही वाचा- वास्तवः भाऊ, दानशूर फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात म्हणून...

खर्च निखावा म्हणून होताये हालचाली
दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागण्याच्या बेताने दरवर्षीप्रमाणे यंदाही टरबूज, खरबूज व काकडीचा पेरा चांगला प्रमाणात केला होता. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या पिकावर व्यापाऱ्यांची साखळी तुटली. त्यामुळे हा माल विक्री करावा कसा अशा गंभीर प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला असून, कमीत-कमी खर्च तरी निघावा म्हणून शेतातच कवडीमोल भावातून हा माल विक्री करण्यावर सद्या भर दिला जात असल्याचे पहावयास मिळत आहे.

द्राक्ष मिळू लागली घरपोच
नाशिकच्या परिसरातील शेतकऱ्यांना द्राक्षाची उत्पादकता बऱ्यापैकी मिळत असली तरी, खरेदीदार माल घेण्यास तयार नसल्याने ट्रकचे-ट्रक माल महाराष्ट्रभर पोचवत ग्राहकांना स्वस्तात घरपोच विक्रीचा पर्याय त्यांनी शोधला आहे. सध्या चांगल्या दर्जाची एक पेटी 200 ते 300 रुपयात मिळत आहे. संत्रा, मोसंबी, टरबूज, खरबूज असे सगळेच गावोगावी स्वस्तात मिळत असल्याने ग्राहकांची खवय्येगिरी वाढली आहे.

विक्रीला मिळत आहे प्रतिसाद
पिकवलेला भाजीपाला विकण्यासाठी गावात सात भरते. परंतु, तेथे अनावश्‍यक गर्दी होवू नये म्‍हणून आम्‍ही थेट शेतातूनच  भाजीपाला विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहक देखील गर्दीच्‍या ठिकाणी जाणे टाळत असून, शेतातून बऱ्यापैकी भाजीपाला विक्रीचा प्रतिसाद मिळत आहे. 
-गजानन रोठे, भाजीपाला विक्रेता, टाकरखेड