अमरावतीच्या महापौरांच्या गाडीला ट्रकची धडक, सुदैवाने जीवितहानी टळली

vehicle of amravati mayor meet accident at tiosa of amravati
vehicle of amravati mayor meet accident at tiosa of amravati

अमरावती : नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या ट्रकने अमरावती महानगरपालिकेचे महापौर चेतन गावंडे यांच्या वाहनाला धडक दिली. सुदैवाने महापौर सुखरूप आहेत. मात्र, त्यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

तिवसा शहरातील पेट्रोल पंप चौक हे अपघाताचे स्थळ असून याठिकाणी अनेकदा दुचाकी व मोठ्या वाहनाचे अपघात होत असतात. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास महापौर गावंडे नागपूरवरून अमरावती जात असताना तिवसा शहराच्या पेट्रोल पंप चौकात आपले शासकीय वाहन उभे केले. यावेळी नागपूरवरून येणारा ट्रकने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यामध्ये वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

ट्रक चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली असून महापौर यांच्यासह वाहन चालक व सुखरूप आहे तर पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com