डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू; बदल्यात भावाकडून गोळ्या झाडून डॉक्टरचा खून

उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यानेच आपल्या भावाचा मृत्यू झाला म्हणून त्याने बदला घेतला असे पोलिसांनी सांगितले.
Crime
CrimeSakal
Updated on

उमरखेड : उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्यानेच आपल्या भावाचा मृत्यू झाला. या घटनेचा बदला घेण्यासाठी येथील डॉ. हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या झाडून खून (Murder) केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Vidarbh Crime News Updates)

उमरखेड येथील आर. पी. कुटीर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत धर्मकारे यांची अनोळखी व्यक्तीने गोळ्या झाडून मंगळवारी चारदरम्यान पुसद-उमरखेड रोडवरील साकळे विद्यालयासमोर हत्या केली होती. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. विविध तर्कवितर्क लावले जाऊ लागले. आरोपीला अटक करावी, अशी मागणी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी लावून धरली. पालकमंत्र्यांना निवेदन दिले.

Crime
पुणे : नळाला येतंय थेट धरणातलं दूषीत पाणी

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भुजबळ पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांची विविध तपास पथके तयार करून तपास सुरू केला. गोळ्या चालविल्यानंतर आरोपी 12 मिनिटांत ढाणकी येथे पोहोचल्याची चर्चा झाली. त्या दिशेने पोलिसांनी तपास केला असता मारेकऱ्यास मदत करणारेच ढाणकी येथील असल्याची बाब समोर आली. चार मे २०१९ रोजी भावाचा अपघात झाल्यानंतर त्याला उपचारासाठी उमरखेड येथील कुटीर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. योग्य उपचार न मिळाले त्याचा मृत्यु झाला. याचा बदला घेण्याच्या उद्देशाने लहान भावाने डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा गोळ्या झाडून खून केला.

त्याला या घटनेत सहकार्य करणाऱ्या मामासह चौघांना अटक केली आहे. प्रमुख आरोपी अद्याप फरार आहे. त्याला पकडण्यासाठी दहा पथके मागावर असल्याची माहीती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ़. भुजबळ यांनी दिली. सदर घटनेमुळे चार दिवसापासून सुन डॉ. धर्मकारे यांच्या हत्येबाबत सुरू असलेल्या चर्चाना पुर्णविराम मिळाला. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेबाबत डॉक्टरांची हत्या करण्यात आल्याने वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्य केल्या जात आहे. घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशन उमरखेड, बिटरगाव, पोफाळी, दराटी यांचे एक एक पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे चार पथके व सायबर सेलची दोन पथक असे एकूण दहा पथक तयार करून तपास कामी लावण्यात आले होते.

घटनेनंतर त्वरित जिल्ह्यातील व जिल्हे लगतच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यांनी डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांचा पूर्वइतिहास , कौटुंबिक कलह व आर्थिक वाद याची पडताळणी केली. घटनास्थळावरील उमरखेड शहरातून बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज संकलित केले होते. तसेच डॉ. धर्मकारे यांच्या वैद्यकीय सेवा काळात घडलेल्या घटना बाबत सखोल माहिती प्राप्त करण्यात आली होती. त्यानुसार ४ जानेवारी २०१९ चे रात्री शिवाजी चौक उमरखेड येथे शेख अरबाज शेख अब्रार याचा अपघात होऊन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. हनुमंत धर्मकारे हे कर्तव्यावर होते.

अपघातातील युवक मरण पावल्यानंतर मृतकाच्या लहान भाऊ व या घटनेतील मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अबरार ( २२ ) व त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर धर्मकारे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावरून सदर प्रकरणातील तांत्रिक बाबीचे बारकाईने विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असलेला संशयित व्यक्ती शेख एफाज शेख अबरार हाच असल्याचे तपासात समोर आले. त्यानंतर तगोपनीय व्यक्तींच्या आधारे माहिती काढली असता शेख एफाज उर्फ अप्पू शेख अबरार ( २२ ) त्याचे मामा सय्यद तोसिफ सय्यद खलील यांनी व त्यांच्या इतर मित्राच्या मदतीने डॉक्टर यांना गोळ्या घालून ठार मारून ढाणकी येथून पसार झाल्याची माहिती मिळाली.

Crime
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांत वाद; भाडोत्री गुंडांकडून कोयत्याने वार

या माहितीच्या आधारे पोलिसांनी मारेकर्‍याचा मामा सय्यद तौसीफ सय्यद खलील ( ३५ ) सय्यद मुस्ताक सय्यद खलील ( ३२ ) , शेख मोहसीन शेख कयूम ( ३४ ) शेख शाहरुख शेख आलम ( २७ ) या चौघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यामध्ये गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख एफाज शेख अबरार याने डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्यावर पाळत ठेवून गोळ्या झाडून ठार केले. त्वरित ढाणकी गाठले. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल त्याने मामा तौसिफच्या ताब्यात दिली व इतर साथीदाराच्या मदतीने ढाणकी येथून पसार झाला. त्यामुळे आपल्या भावाचा मृत्यूचा वचपा व बदला घेण्याच्या उद्देशाने प्रतिशोध म्हणून गोळ्या झाडून ठार मारल्याची हकीगत पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे.

सदर गुन्ह्यामध्ये चौघांना अटक करून मुख्य आरोपीला पसार करण्यात वापरलेले वाहन क्रमांक एम एच ०४ डी एन ६२६३ हस्तगत करण्यात आले आहे. मुख्य मारेकरी हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी दहा पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासात भांदवीच्या कलम वाढविण्यात आल्या आहेत.

सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक के.ए. धरणे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी, उमरखेड ठाणेदार अमोल माळवे, पोस्टे बिटरगाव, दराटी सायबर सेल अधिकारी अमोल पुरी व त्यांच्या आधिपत्याखालील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सदर घटना उघडकीस आणल्याबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तपास पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना एक लाख रुपयांची रोख प्रोत्साहनपर बक्षीस, सी नोट व जीएसटी जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com