Vidarbha farmer crisis
esakal
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते...मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते. कवी सुरेश भट यांनी या ओळीतून शेतकऱ्यांच्या व्यथा नेमक्या मांडल्या आहेत. ताण-तणाव, कर्जबाजारीपणा आणि सरकारी अपयशाच्या ओझ्यामुळे निराशेच्या गर्तेत सापडलेल्या विदर्भातील हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. मरणानंतरही त्या शेतकऱ्यांची वेदना कमी झालेली नाही. आत्महत्या पात्र की अपात्र अशा निकषात ते अडकलेल्या आहेत. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा आत्महत्यांची केवळ भीषणताच दाखवत नाही, तर सरकारच्या कृषी धोरणांच्या अपुऱ्या अंमलबजावणीची साक्षही ओरडून देत आहे. आत्महत्या रोखण्यात योजनांची अंमलबजावणी करण्यातील हेळसांड व सरकारला आलेले अपयश अधोरेखित करणारे आहे.