esakal | माणुसकीचे असेही दर्शन, आग लागताच गाव आले धावून अन् तलावातील पाण्यानी विझविली आग
sakal

बोलून बातमी शोधा

villagers successfully control fire in gondpipari of chandrapur

धाब्यालगत कोंढाणा येथील राजू येनमपल्लीवार यांची दीड एकर शेती आहे. या शेतात धानकापणी केल्यानंतर त्यांनी शेतातच धानाचे पुंजणे ठेवले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका वेडसर महिलेने त्यांच्या पुंजण्याला आग लावली. 

माणुसकीचे असेही दर्शन, आग लागताच गाव आले धावून अन् तलावातील पाण्यानी विझविली आग

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी ( जि. चंद्रपूर ) :  गावातील एका शेतकऱ्याच्या धानाच्या पुंजण्याला वेडसर महिलेने आग लावली. क्षणार्धात आगीचा भडका उडाला. ही माहिती गावभर पसरली. गस्तीवर असलेल्या पोलिसांना आगीची बातमी समजली. काही वेळात पोलिस घटनास्थळी पोहोलचे. अग्निशमन वाहनाची वाट बघणे शक्‍य नव्हते. यामुळे पोलिस व गावकऱ्यांनी गावाच्या तलावापासून तर घटनास्थळापर्यंत मानवी साखळी तयार केली अन्‌ यातून आग विझविली. शुक्रवारी (ता. 20) सकाळच्या सुमारास तालुक्‍यातील कोंढाणा शेतशिवारात हा प्रसंग बघायला मिळाला.

हेही वाचा - शेतकऱ्यांनो खुशखबर! धान उत्पादकांना मिळणार बोनस; हमीभावात होणार वाढ

धाब्यालगत कोंढाणा येथील राजू येनमपल्लीवार यांची दीड एकर शेती आहे. या शेतात धानकापणी केल्यानंतर त्यांनी शेतातच धानाचे पुंजणे ठेवले. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एका वेडसर महिलेने त्यांच्या पुंजण्याला आग लावली. आगीचा भडका उडाल्याने गावकऱ्यांनी धावाधाव केली. धाब्याचे ठाणेदार सुशील धोपटे हे आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांची चमू व गावातील नागरिकांनी एक साखळी तयार केली. या माध्यमातून तलावाच्या पाण्याने आग विझविण्यात आली. यात येनमपल्लीवार यांचा धानाचा ढिगारा जळून खाक झाला. मात्र, लगतच्या शेतकऱ्याचा ढिगारा वाचविण्यात यश आले.

हेही वाचा - शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला; अवकाळी...

गोंडपिपरीचे तहसीलदार के. डी. मेश्राम यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस व नागरिकांच्या सहकार्याने पुढील अनर्थ टळल्याने तहसीलदार मेश्राम यांनी पोलिस व नागरिकांच्या भूमिकेचे कौतुक केले. महसूल विभागाने घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचा - अवघ्या दोन दिवसांनी वाजणार शाळेतील घंटा, कोरोनापूर्वी...

पेट्रोलिंगवर असताना कोंढाण्यात धानाच्या पुंजणाला आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर आम्ही तातडीने घटनास्थळी पोहोचलो. अग्निशामक वाहनाला विलंब असल्याने आम्ही नागरिकांच्या मदतीने साखळी तयार केली व आग विझविली.
- सुशील धोपटे, ठाणेदार, धाबा
 

loading image