esakal | विनोद डिडवाणीया यांची कोरोना लढ्यासाठी एक लाखांची मदत

बोलून बातमी शोधा

Vinod Didwaniya's contribution to one lakh to fight Corona

खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद डिडवाणीया यांनी कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी होत पंतप्रधान सहायता निधीत एक लाख रुपये मदत केली. सर्व प्रथम मदतीसाठी पूढे येत ते खामगाव शहरातील पहिले दानशूर ठरेल आहेत. 

विनोद डिडवाणीया यांची कोरोना लढ्यासाठी एक लाखांची मदत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : खामगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद डिडवाणीया यांनी कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी होत पंतप्रधान सहायता निधीत एक लाख रुपये मदत केली. सर्व प्रथम मदतीसाठी पूढे येत ते खामगाव शहरातील पहिले दानशूर ठरेल आहेत. 

विनोद डिडवाणीया हे किराणा व्यापारी असून त्यांचे खामगाव येथील घाटपुरी नाका भागात विनोद सुपर शॉप आहे. व्यवसाय करताना त्यांनी नितिमूल्य जोपासली आहेत त्याचा प्रत्यय  वारंवार येत असतो. सामाजिक कार्यात डिडवाणीया हे नेहमी सक्रिय दिसून येतात. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी जाहीर झाल्यानंतर डिडवाणीया यांनी गोरगरीब लोकांची मोफत जेवणाची व्यवस्था केली होती. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आता डिडवाणीया यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये एक लक्ष रुपयांची मदत जाहीर केली. दैनंदिन जीवनात अनावश्यक खर्च टाळून आपण कोरोना ग्रस्तांसाठी मदत करत आहोत. प्रत्येक शहरातून ज्यांची ऐपत आहे अशा लोकांनी जर मदत केली तर एक मोठा निधी उभा राहू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही डिडवाणीया यांनी केले आहे. 

कुटुंबासमोर ठेवला प्रस्ताव 
कोरोना ग्रस्तांसाठी एक लक्ष रुपयांचा निधी देण्याची संकल्पना त्यांनी वडील रालमनलालजी, पत्नी ममता व मुलगा हर्षल व ऋषीकेष,  मुलगी डॉ. निकीता यांच्यासमोर ठेवली. यावेळी डिडवाणीया कुटुंबातील सर्व सदस्यांनी मदत देण्याबाबत एकमत केले. त्यानंतर कुटुंबाच्या सहमतीने डिडवाणीया यांनी एक लाख रुपयांची रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीमध्ये जमा केली आहे.

अनावश्‍यक खर्च टाळा
त्याग आणि समर्पण ही आपल्या भारत देशाची संस्कृती आहे. त्यामुळे कोरोनाच्‍या या संकटावर मात करण्यासाठी तसेच त्यानंतर येणाऱ्या आर्थिक संकटाला सामाेरे जाण्यासाठी प्रत्येकाने दानशूर वृत्ती दाखवून मदत करणे गरजेचे झाले आहे.  आज कित्‍येक लोकांना दोन वेळच्‍या जेवनाची भ्रांत आहे. त्‍यामुळे काही दिवस आपले अनावश्‍यक खर्च,  व्यसन, टूर टाळावे. प्रत्‍येक शहरातून अशी मदत झाली तर आपण एक लाख करोड एवढी मोठी रक्कम उभी करू शकतो आणि ही रक्कम देशात निर्माण होणाऱ्या आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी कामी येईल असा संदेश विनोद डीडवाणीया यांनी दिला आहे.

माझ्याजवळ खूप पैसा आहे किंवा मला दानशुर म्‍हणून ओळखल्‍या जावे असा माझा हेतु नसून आपल्‍यावर आलेल्‍या या संकटाशी लढण्यास सर्व एकत्रित आले तर नक्‍कीच आपण त्‍यावर मात करु अशी माझी प्रमाणिक भावना आहे.कोरोना तसेच आर्थिक संकटाला तोंड देणे देशासाठी गरजेचे आहे. त्‍यामुळे व्यापारी , उद्योजक, अभिनेते व ज्यांना शक्य आहे त्या प्रत्‍येकाने आपआपल्‍या परिने मदत करावी.
- विनोद डिडवाणीया, संचालक विनोद सुपर बाजार, खामगाव