esakal | भव्य रथांतून होणार गणरायाचे विसर्जन; यवतमाळ महापालिकेची भन्नाट संकल्पना; वाचा सविस्तर 
sakal

बोलून बातमी शोधा

Visarjan rath arranged for ganpati visarjan in Yavatmal

यंदाचा गणेशोत्सव कोरोनात सापडला आहे. त्यामुळेच उत्साह आणि जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत होत आहे. कोरोना संसर्ग पसरू नये, यासाठी काळजी घेतल्या जात आहे.

भव्य रथांतून होणार गणरायाचे विसर्जन; यवतमाळ महापालिकेची भन्नाट संकल्पना; वाचा सविस्तर 

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. विसर्जनावेळी गर्दी होऊ नये, यासाठी पालिकेने नवी संकल्पना समोर आणली आहे. शहरातील 28 प्रभागांमध्येही यावेळी विसर्जन रथ असणार आहे. यात घरगुती गणेशमूर्ती एकत्रित करून एकाच वेळी त्यांचे विसर्जन केले जाणार आहे. याशिवाय, विसर्जनासाठी 31 कृत्रिम टाके तयार केले जाणार असून 25 सार्वजनिक विहिरींची स्वच्छता केली जात आहे.

यंदाचा गणेशोत्सव कोरोनात सापडला आहे. त्यामुळेच उत्साह आणि जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव शांततेत होत आहे. कोरोना संसर्ग पसरू नये, यासाठी काळजी घेतल्या जात आहे. सार्वजनिक मंडळांनीही यावेळी सामाजिक भान जपत गणेशाची स्थापना केली नाही. घरगुती उत्सवच नागरिक आनंदात तसेच भक्तिमय वातावरणात साजरा करीत आहे. 

क्लिक करा - भले शाब्बास! पुसद नगरपालिका म्हणे पहिला नंबर!

विसर्जनाच्या वेळी गर्दी होऊ नये, यासाठी प्रशासन आता कामाला लागले आहे. विसर्जनाचे वेळी गर्दी होऊन संसर्ग पसरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळेच पालिकेने शहरी भागात तयारी सुरू केली आहे. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक प्रभागात फिरते विसर्जन रथ पालिकेचा असणार आहे. ज्यांना मूर्ती पालिकेला द्यावयाची असेल ते पूजा करून आपली मूर्ती पालिका कर्मचाऱ्यांकडे देऊ शकणार आहे. 

31 ठिकाणी कृत्रिम टाक्या 

याशिवाय, शहरात 31 ठिकाणी कृत्रिम टाक्या तयार केले जाणार आहे. याठिकाणी नागरिक लाडक्‍या बाप्पांचे विसर्जन करू शकणार आहे. तसेच शहरातील सार्वजनिक विहिरींची स्वच्छता केली जाणार आहे. पालिका क्षेत्रातील 25 विहिरी विसर्जनासाठी उपलब्ध असणार आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी यावेळी पालिकेची जोरदार तयारी सुरू आहे. कोरोनाच्या काळात गर्दी होऊ नये, यावरच पालिकेचे प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी नियोजन पालिकेने केले असून विहीर स्वच्छतेचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे.

जलयुक्तच्या निकृष्ट बांधकामामुळे फुटले दोन बंधारे...२५ एकरांतील शेतीपिकांचे नुकसान

प्रभागात तीन सदस्यीय पथक

विसर्जन तसेच गणेशोत्सवाच्या काळात गर्दी होऊ नये, यासाठी प्रत्येक प्रभागात तीन सदस्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. यात महसूल, पोलिस तसेच पालिकेच्या एका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. प्रभागात गणेशोत्सवाची गर्दी होऊ न देण्याची जबाबदारी या पथकावर आहे. शहरात 28 पथके तयार करण्यात आले असून गर्दी तसेच कार्यक्रमावर त्यांचा वॉच असणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top