
वडाळी देशमुख : स्थानिक ग्रामपंचायत कार्यालया समोर असलेल्या मुख्य रोडवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळणी करून ठेवली असून, गावातील सांडपाणी खड्ड्यात पाणी साचलत आहे. त्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढत असल्याने परिसरातील नागरिकांना अनेक आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यांना धोका निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या कार्यावर नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. आज होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना याच खड्ड्यातून जावे लागणार आहे.
खड्ड्यात झाले अनेक वाहने पलटी
गावामध्ये ये-जा करण्यासाठी मुख्य रस्ता हाच असल्यामुळे या रस्त्याने पायी चालणे देखील कठिण झाले आहे. गेल्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. विद्यार्थ्यांसहीत परिसरातील अनेक लोकप्रतिनिधी याच रस्त्याने ये-जा करतात. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार व मतदान मागण्यासीठी अनेक उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना याच रस्त्याचा सामना करवा लागला आहे. खड्ड्यात पाणी साचलेले असल्यामुळे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. वाहन चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा खड्ड्यामध्ये वाहन पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
क्लिक करा - अतिक्रमीत जमिनीवरून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू
नागरिकांना करावा लागतो दुर्गंधीचा सामना
एकीकडे स्वच्छतेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्या जात आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागामध्ये स्वच्छता अभियानाचे नुसते थातूरमातूर देखावे होत असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने गावात साफसफाई राबविली जात नसल्याने परिसरात घाण कचऱ्यांचे मोठमोठे ढीग तयार झाले आहेत. आठवडी बाजारामध्ये स्वच्छागृहाची सफाई देखील केली जात नसल्याने परिसारातील नागरिकांना दुर्गंधीचा समना करावा लागत आहे. यासंबंधित ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना वारंवार तक्रारी दिल्या असून, संबंधित अधिकाऱ्याकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
हेही वाचा - आंबेडकर बंगल्यावरच ‘वंचित’ च्या पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी
समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार
खड्डे बुजविण्याबाबत ग्राम सभेमध्ये ठराव घेऊन, काम मार्गी लावून, नागरिकांच्या समस्याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे.
-मलाताई वाहुरवाघ, सरपंच, वडाळी देशमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.