Nitin Gadkari : देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा - नितीन गडकरी

देशाला महासत्ता बनवायचे आहे. तरुणांच्या हाताला काम, स्मार्ट व्हिलेजची निर्मिती, सिंचनाची सुविधा निर्माण करून शेतकरी उद्योजक बनला पाहिजे
vote to narendra modi for development of india nitin gadkari politics
vote to narendra modi for development of india nitin gadkari politicsSakal

वरुड : देशाला महासत्ता बनवायचे आहे. तरुणांच्या हाताला काम, स्मार्ट व्हिलेजची निर्मिती, सिंचनाची सुविधा निर्माण करून शेतकरी उद्योजक बनला पाहिजे, असे विकासाचे व्हीजन ठेवून देशाचा विकास करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

वर्धा लोकसभा महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या वरुड येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. ६० वर्षे कॉंग्रेसने राज्य केले, त्यात रामराज्याची संकल्पना मांडली. २० कलमी योजना आखून गरिबी हटावचा नारा दिला.

मात्र गरीब आणखीनच गरीब झाला व शेतकरी आत्महत्या वाढत गेल्या. गेल्या ६० वर्षांत गरिबी, बेरोजगारी, भुकमरी वाढतच गेली. त्यातुलनेत १० वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने देशाला विकासाकडे नेले.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने इथले सिंचन प्रकल्प बंद पाडले व भारतीय जनता पार्टीच्या सरकारने १० हजार कोटी रुपयांचे सिंचनाचे काम तसेच निम्न वर्धा प्रकल्प पूर्ण करून बळीराजा जलसंजीवनी योजना आखली. त्यातून ८५६ कोटी रुपये या विभागाला देण्यात आले आहे.

पाणी भरपूर आहे, परंतु नियोजनाचा अभाव आहे. जलसंवर्धनाचे काम आम्ही सुरू केले. नदी खोलीकरण, एक हजार अमृतसरोवर आम्ही बांधले. पाण्याचे जलसंवर्धन केले तर शेतकऱ्यांचे उत्पन्न अडीच पट वाढू शकते, येणाऱ्या काळात कापूस देशामध्ये निर्यात होईल.

संत्र्यासाठी वर्धा जिल्ह्याच्या सिंदी येथे शीतगृत बांधून संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पाठविणार, संत्र्यापासून पावडर करून संत्र्याची बर्फी करण्याची योजना येत्या काळात दिसून येईल. त्यामुळे ‘ये तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’,असे म्हणत काँग्रेसवर सडकून टीका केली.

सभेला महिला व पुरुषांनी दुपारपासूनच मोठी गर्दी केली होती. मात्र नितीन गडकरी यांची प्रकृती अस्वास्थामुळे ते वरुडला येऊ शकणार नाहीत, अशी चर्चा सुरू झाल्याने उपस्थितांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

परंतु आयोजकांनी नितीन गडकरी येणार असल्याची घोषणा केल्यानंतर उपस्थिती कायम राहिली. या प्रचारसभेत भाजप मोर्शी विधानसभा प्रमुख डॉ. मनोहर आंडे, उपप्रमुख अमित कुबडे, माजी नगराध्यक्ष स्वाती आंडे, डॉ. वसुधा बोंडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण राऊत, भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत,

शहराध्यक्ष योगेश्वर खासबागे, मोरेश्वर वानखडे, माजी जि. प. सदस्य गोपाल मालपे, श्रीधर सोलव, माजी नगरसेवक उमेश ऊर्फ चंदू यावलकर, माजी जि. प. सभापती अर्चना मुरूमकर, शिवसेना तालुकाप्रमुख अमोल भुयार, मोर्शीचे नितीन उमाळे, रेश्मा उमाळे, इंद्रभूषण सोंडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र थोरात, राम दुर्गे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com