Wani Road Accident : भरधाव कारची दुचाकीला मागून जोरदार धडक; वणीतील निवृत्त शिक्षक बाळासाहेब टोंगे जागीच ठार

Speeding Car Hits Two-Wheeler From Behind : वणीतील घुगूस मार्गावर भरधाव कारने दुचाकीला मागून धडक दिल्याने निवृत्त शिक्षक बाळासाहेब टोंगे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
Wani Road Accident

Wani Road Accident

esakal

Updated on: 

वणी : शेतातून दुचाकीने वणीकडे परत येत असताना निवृत्त शिक्षकांच्या दुचाकीला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना रविवारी (ता. २७) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घुगूस मार्गावरील जन्नत हॉटेलसमोर घडली. बाळासाहेब अंतूजी टोंगे (वय ६७), रा. प्रगतीनगर, वणी असे अपघातात मृत्यू झालेल्या निवृत्त शिक्षकाचे नाव आहे.

Wani Road Accident
Kalamb Bus Driver Assault : बस रस्त्याच्या कडेला उभी केली म्हणून चालकास मारहाण; कळंबमध्ये दिनेश राठोडविरुद्ध गुन्हा

टोंगे हे जनता विद्यालयातून शिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. टोंगे हे रविवारी आपल्या मूळगावी पुरड येथे दुचाकीने गेले होते. गावाहून वणीकडे परत येत असताना जन्नत हॉटेलसमोर त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव कार (क्र.एमएच २९ एबी ७७७१)ने जोरदार धडक दिली.

धडकेनंतर त्यांना काही अंतर फरफटत नेण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, या भीषण अपघातात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

Wani Road Accident
UPI MDR Update: UPI MDR शुल्काला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; काय म्हणाले कोर्ट?

घटनेमुळे प्रगतीनगर परिसरासह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताबाबत पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com