Wardha : Jio True 5G आता वर्धा आणि भंडाऱ्यामध्ये मध्ये

वर्धा आणि भंडारा मध्ये 5G सेवा सुरू करणारा जिओ पहिलाच ऑपरेटर
Jio True 5G
Jio True 5Gesakal

वर्धा : विदर्भातील भंडारा आणि वर्धा ही दोन शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्क शी जोडले गेले. याच वेळी 16 राज्यातील 41 शहर आज जिओ ट्रू 5G नेटवर्क शी जोडली गेली. तसेच 5G उपलब्ध असलेल्या शहरांची संख्या आता 406 झाली आहे.

वर्धा आणि भंडारा व्यतिरिक्त जिओ ची ट्रू 5G सेवा पुणे, नागपुर, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सातारा, सांगली, इचलकरंजी,अमरावती, अकोला, चंद्रपूर, जळगाव, धुळे, जालना, मालेगाव, चाकण, सोलापूर, बीड, परभणी, लातूर, अहमदनगर येथे उपलब्ध आहे.

याप्रसंगी बोलताना जिओच्या प्रवक्त्याने सांगितले की, “वर्धा आणि भांडाऱ्यामध्ये मध्ये जिओ ची 5G सेवा सादर करताना आम्हाला आनंद होत असून या दोन्ही शहरात 5G सेवा सुरू करणारा जिओ हा पहिलाच ऑपरेटर आहे.

आम्ही जिओ ट्रू 5G तंत्रज्ञान त्याच्या विश्वसनीय वायरलेस नेटवर्कसह विदर्भ आणि महाराष्ट्रातील लोकांना प्रगत आरोग्य सेवेच्या क्षेत्रात फायदा होणार आहे. कृषी, शिक्षण, ई-गव्हर्नन्स, आयटी, एसएमई, ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, गेमिंग आणि इतर अनेक क्षेत्रातही अनेक फायदे मिळतील. महाराष्ट्र डिजीटल करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही महाराष्ट्र सरकारचे आभारी आहोत.”

Jio True 5G
Nagpur News: ऑनलाइन फसवणुकीवर लागणार लगाम

आजपासून, शहरातील जिओ वापरकर्त्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय, 1 Gbps+ पर्यंत स्पीडवर अमर्यादित डेटाचा अनुभव घेण्यासाठी जिओ वेलकम ऑफरसाठी आमंत्रित केले जाईल.

जिओ ही एकमेव कंपनी आहे जिने 4G नेटवर्कवर शून्य अवलंबित्व असलेले स्टँडअलोन ट्रू 5G नेटवर्क तैनात केले आहे. स्टँडअलोन ट्रू 5G सह, जिओ नवीन आणि शक्तिशाली सेवा देऊ शकते जसे की कमी लेटन्सी कनेक्टिव्हिटी, मशीन-टू-मशीन कम्युनिकेशन, 5G व्हॉइस, एज कॉम्प्युटिंग आणि नेटवर्क स्लाइसिंग.

Jio True 5G
Akola News : पाणी आरक्षण...पूल... अन् राजकीय ट्रँगल!

जिओ ट्रू 5G सेवा मिळवण्यासाठी ग्राहकांना त्यांचे सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. त्यांना एक जिओ 5G नेटवर्क सुसंगत 5G हँडसेट, राहत्या / कामाच्या ठिकाणी 5G नेटवर्कची उपलब्धता तसेच प्रीपेड आणि सर्व पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी 239 किंवा अधिक वैध सक्रिय योजनेवर असणे आवश्यक असेल. एकदा या निकषांची पूर्तता झाल्यानंतर, जिओ ग्राहकांना जिओ वेलकम ऑफर मिळेल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com