गॅस कंटेनर आणि ट्रेलरची समोरासमोर जोरदार धडक

राहुल खोब्रागडे
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पवनार येथील येरीकेशन कॉलनीजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलर क्रमांक एमएच ४० एके २५६८ या ट्रेलरवर जाऊन धडकला.

वर्धा : आोव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगाने नागपूरकडे जाणाऱ्या एच.पी. गॅस कंटेनरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

ही घटना (सोमवार, ता. ३०) रात्री १० वाजताच्या सुमारास वर्धा - नागपूर महामार्गावर पवनार नजीक घडली. एच.पी. गॅस कंटेनर क्रमांक एमएच ४३ बीजी २४०८ हा भरधाव वेगात नागपूरकडे जात होता. पवनार येथील येरीकेशन कॉलनीजवळ एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलर क्रमांक एमएच ४० एके २५६८ या ट्रेलरवर जाऊन धडकला.

दोन ट्रक सामोरासामोर धडकले. यात दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या रोडवरची सर्व वाहतूक ठप्प झालेली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक वाहनचालकांनी आपली वाहने दुसऱ्या मार्गाने वळवली. किमान चार पाच तास वाहतूक सुरळीत होने शक्य नाही.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: wardha news accident gas container trailer collide