विदर्भातील हा ‘जिल्हा ग्रीनझोन’मध्ये, म्हणून आता चेकपोस्टवर...

checkpost.jpg
checkpost.jpg
Updated on

कारंजा (जि.वाशीम) : देशांसह राज्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाने संचारबंदीचा तिसरा टप्पा घोषित करून लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या या काळात प्रशासनाने विशेष काळजी घेतल्याने तालुका कोरोनामुक्त असून, जिल्हा सुद्धा ग्रीन झोनमध्ये आहे. 

सद्यपरिस्थितीत शासनाने परराज्यात व परजिल्ह्यात अडकून पडलेल्यांना आपल्या गावी जाण्यासाठी मुभा दिली असल्याने कारंजा तालुक्यात येणाऱ्या नागरिकांची गर्दी वाढणार असल्याची बाब लक्षात घेऊन त्यांची थेट चेकपोस्ट वरच डॉक्टर्स मार्फत तपासणी करून त्यांना तालुक्यात प्रवेश देण्यात येणार आहेत. याकरिता, तहसील प्रशासनाच्या वतीने चेकपोस्टवर डॉक्टरांची टीम तैनात करण्यात आली आहे.

ग्रामीण भागात खेर्डा, ढंगारखेड, सोमठाणा, दोनद व महागाव या 5 ठिकाणी पोलिस चेकपोस्टवर 20 डॉक्टरांची नियुक्ती तहसीलदार यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. नेमणूक केलेल्या या डॉक्टरांना प्रत्येकी 6 तास म्हणजेच 24 तास 4 डॉक्टर याठिकाणी, तैनात राहणार आहे. यात खेर्डा चेकपोस्टवर डॉ. अरुण ढवक, डॉ. गोवर्धन ढगे, डॉ. गजानन मुंदे व डॉ. प्रवीण जाजू, ढंगारखेड येथे डॉ. भूषण अलमवार, डॉ. प्रकाश अजमिरे, डॉ. दत्ता भेराणे व डॉ. विजू कडू , सोमठाणा येथे डॉ. मोहन फुलमाळी, डॉ. सुदाम राठोड, डॉ. अविनाश मनवर व डॉ. किरण झडपे, दोनद येथे डॉ. मुकुंद देशमुख, डॉ. विष्णू दहापुत, डॉ. न. प. चौधरी, डॉ. गजानन भेंडे तर महागाव या चेकपोस्टवर डॉ. विशाल उपाध्ये, डॉ. पिरालाल राठोड, डॉ. मंगेश मसणे व डॉ. मोहन धाडवे यांची नेमणूक केली आहे. 

तहसीलदारांच्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर्सवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 नुसार व महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 तसेच साथरोग अधिनियम 1897 नुसार कारवाई करण्यात येईल. तसेच नोंदणी रद्द करण्याकरिता इंडियन मेडिकल कॉन्सिल व आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणास कळविण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिली.

20 डॉक्टरांची नियुक्ती
वाशीम जिल्हा ग्रीन झोन मध्ये असला तरी यापुढे बाहेरील राज्यातून किंवा गावातून येणाऱ्या नागरिकांमधून कोरोना विषाणूंचा फैलाव होऊ नये, यासाठी पाच चेकपोस्टवर 20 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे डॉक्टर्स बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करतील त्यानंतरच त्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे.
- धीरज मांजरे, तहसीलदार, कारंजा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com