भान तर ठेवा राव... ही पाण्याची कॅन नाही, वाचा काय झाले 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 December 2019

सर्वांच्या घरी गॅस असून, त्यासाठी लागणारे विविध कंपनीचे सिलेंडर घरपोच पुरविले जाते. यासाठी ग्राहक पैसे मोजतात. यामुळे वेळ बचत होते आणि त्रासही होत नाही. मात्र, याच सिलेंडरमध्ये गॅस ऐवजी दुसरेच काही आहे असे म्हटले तर... काहीही बोलता का असच काही म्हणाल. मग वाचा... 

चिमूर (जि. चंद्रपूर) : चुलीवर स्वयंपाक करणे त्रासदायक असल्यामुळे गॅस आली. यामुळे महिलांची समस्या सुटली अन्‌ आनंद निर्माण झाला. महिलांच्या सोयीसाठी सरकारकडून उज्वला गॅसचे वाटप खेड्यात करण्यात येत आहे. चुलीच्या धुरापासून त्यांची सुटका व्हावी हा त्यामागचा हेतू. मात्र, सिलेंडरच्या भाववाढीमुळे डोक खराब झाले आहे. यामुळे गृहिणींचे बजेट बिघडत असून, नानाविध समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या कमी होती की काय सिलेंडरमध्ये गॅस ऐवजी पाणी असल्याचे समोर आल्याने चिंतेत भर पडली आहे. 

क्लिक करा - बलात्कार... तिने घेतले उंदीर मारायचे औषध

चंद्रपूर जिल्ह्यातील भिती तालुका... येथे शांताबाई मोटघरे राहतात... त्यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच "इंडेन' गॅसचे सिलेंडर आले... स्वयंपाक करीत असताना गॅस अचानक बंद पडली. काही दिवसांपूर्वीच सिलेंडर आणल्याने संपण्याचा प्रश्‍नच नव्हता. गॅस सुरू करण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटचा उपाय म्हणून सिलेंडर हलवून बघितला. तेव्हा आतून पाणी हल्ल्याचा आवाज आला. सिलेंडरला आडवे करून बघितले असता त्यातून चक्‍क हंडाभर पाणी बाहेर आले अन्‌ सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला. 

भिसी येथे गॅस एजन्सी नाही. त्यामुळे येथील ग्राहक नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील श्री. गॅस डोमेस्टिक अप्लायन्स या एजन्सीमधून सिलेंडर खरेदी करतात. या परिसरात हजारो ग्राहक आहे. या एजन्सीची सिलेंडर भरलेली गाडी आठवड्यातून तीनदा भिसीला येते. याच वाहनातील सिलेंडर शांताबाईचा मुलगा नितेशने खरेदी केला. मोटघरे यांनी काही दिवस सिलेंडर वापरले होते. 

जाणून घ्या - भरधाव दुचाकी धडकली अन्‌ झाले अघटित

एक दिवस स्वयंपाक करणे सुरू असताना गॅस अचानक बंद पडली. गॅस सिलेंडर आणून जास्त दिवस न झाल्याने संपण्याचा प्रश्‍नच नव्हता. नीतेश मोटघरे यांनी गॅस सुरू करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. वारंवार प्रयत्न करूनही गॅस का पेटत नाही, याची तपासणी केली. सिलेंडर हलवून पाहिले असता सिलेंडरमध्ये पाणी असल्याचा आवाज आला. आडवा केला तेव्हा सिलिंडरमधून पाणी बाहेर पडले. सिलेंडरमध्ये गॅस ऐवजी पाणी असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार बघून मोटघरे परिवाराला धक्काच बसला. 

तांत्रिक स्वरूपाची चूक 
सिलेंडरमध्ये योग्य दाबाचा वापर करून गॅस भरला नाही तर द्रवरूपात भरल्या गेलेल्या एलपीजीचे गॅसमध्ये रूपांतर होत नाही. ही तांत्रिक स्वरूपाची चूक आहे. हजारोमधून असा एखादा सिलेंडर निघू शकतो. आम्ही सिलेंडर बदलून द्यायला तयार आहोत. 
श्री. व्यंकट, 
व्यवस्थापक, श्री. गॅस एजन्सी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water in cylinder at Chandrapur