pandhari car
pandhari car

त्या पांढऱ्या कारमध्ये नेमके होते काय? पोलिसांनी केला पाठलाग आणि...

चिमूर : ;चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. परिणामी तिथे अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. त्यामुळे चिमूर पोलिसांनी कारवायांचा सपाटा लावला असतानाच अवैध विक्रेते पोलिसांना गुंगारा देत कोणत्या ना कोणत्या मार्गाने तस्करी करीत दारूची विक्री करीत आहेत. गुरुवारी रात्री चारचाकी वाहनाने होत असलेल्या तस्करीतील सुमारे ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा दारूसाठा पोलिसांनी जप्त केला. यावेळी श्‍यामराव कवडू मुरतेली उर्फ श्‍यामा मुळे यांना अटक करण्यात आली.

चिमूर शहरात नवीननवीन विक्रेते अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात उतरले आहेत. हे विक्रेते पोलिसांच्या नजरेत न येता छुप्या मार्गाने चिमुरात तस्करी करून दारूची विक्री करीत आहेत. अशाच एका छुप्या रूस्तमला पकडण्यासाठी चिमूर पोलिसांनी नवीन युक्ती लढविली.

खासगी वाहनाचा वापर करून मिळालेल्या माहितीनुसार पाळत ठेवून एका पांढऱ्या रंगाच्या एमएच ३४ एएम ४३६१ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा पाठलाग सुरू केला.

चालकाने वाहन थांबवीत अंधाराचा फायदा घेत पळ काढला. यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून फरार चालकाचा शोध घेतला. त्यानंतर श्‍यामराव कवडुजी मुरतेली उर्फ श्‍यामराव मुळे (रा. वडाळा पैकू चिमूर) याला अटक केली.

सविस्तर वाचा - ती ढसा ढसा रडत होती; कारण, सर्व मागण्या पूर्ण केल्यावरही त्याने बोहल्यावर चढण्यास दिला नकार

ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अनुज तारे, पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मोहोड, किशोर बोढे, सचिन गजभिये, सतीश झिलपे, विजय उपरे यांच्या पथकाने केली.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com