काय चूक होती पित्याची की, मुलानेच केले असे काही...

What was wrong with the father, that the child did something ...
What was wrong with the father, that the child did something ...

नागपूर : दारूमुळे अनेक कुटुंब उद्धवस्त होतात, कधीतरी तर सर्वनाशही ओढवतो, तरीही दारू सोडवत नाही. अशी अनेक उदाहरणे आपण समाजात सगळीकडे बघतो. पण दारूच्या नशेत चक्‍क एका मुलाने जन्मदात्या पित्याचाच खून केल्याची घटना नुकतीच घडली आणि एक घर होत्याचे नव्हते झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्‍यामसुंदर नायडू हे मध्य रेल्वेत पार्सल लगेज पोर्टर म्हणून कामाला होते. श्‍यामसुंदर यांचे पत्नी मंगला, मुलगा अमित, सून अनुराधा, नातू अंशुमन आणि नात शरण्या असे कुटुंब आहे. अमित हा काहीच कामधंदा करीत नव्हता. तो रागीट आणि गुंड प्रवृत्तीचा होता. त्याला अंमली पदार्थाचे व्यसन होते. त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल असल्याने अनेकदा त्याला मध्यवर्ती कारागृहात डांबण्यात आले होते. अमितच्या या त्रासाला कंटाळून घटनेच्या एक वर्षापूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. अमितच्या या कृत्यामुळे त्याचे वडील श्‍यामसुंदर हे त्याच्याशी बोलत नव्हते. त्यामुळे, श्‍यामसुंदर घरी असले की अमित घरात थांबत नसे.

10 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी दोघेही बापलेक दारू पिऊन घरी आले. श्‍यामसुंदर यांनी अमितला "तू काहीच कामधंदा करीत नाही. गुंडगिरी आणि चोऱ्या करतोस. माझे नाव खराब केले' असे बोलून शिवीगाळ केली. त्यामुळे अमित चिडला आणि त्याने श्‍यामसुंदर यांना मारहाण करायला सुरुवात केली. स्टीलच्या गंजाने आणि लाकडी पाटीने त्याने श्‍यामसुंदर या मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी श्‍यामसुंदर हे जोरजोरात आरडाओरड करीत होते. अमितची आई मंगला हिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याने आईलासुद्धा ढकलून दिले. अमितचे उग्र रूप पाहून त्याच्या आईने दोन्ही नातवांना घेऊन स्वत:ला एका खोलीत कोंडले. नातू अंशुमन याने त्याच्या मोबाईलवरून एका नातेवाइकाला फोन करून ही माहिती दिली. गंभीर अवस्थेत श्‍यामसुंदर यांना सर्वप्रथम रेल्वे हॉस्पिटल आणि तेथून मेयो रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.याप्रकरणी तहसील पोलिसांनी 307, 302 अन्वये गुन्हा नोंदवून अमितला अटक केली. तहसीलचे तत्कालीन पोलिस निरीक्षक कवडू बी. उईके यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी अमितच्या विरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह 10 साक्षीदार तपासण्यात आले.

अमीत मनोरुग्ण असल्याचा दावा

बचाव पक्षातर्फे आरोपी अमित हा मनोरुग्ण असून त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते. मनोरुग्णावस्थेत त्याने हे कृत्य केल्याने त्याला सोडून देण्यात यावे, अशी न्यायालयाला विनंती केली. न्यायाधीश भरूका यांनी दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून आरोपी अमित यास कलम 304(2) अन्वये 10 वर्षाचा कारावास आणि 10 हजार रुपये दंड सुनावला. आरोपीतर्फे ऍड. शीतल देशपांडे यांनी तर सरकारतर्फे सहायक सरकारी वकील पंकज तपासे यांनी बाजू मांडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com