अलमडोह येथे घराच्या खोदकामात सापडली कशाची नाणी...अन्‌ मग गावात चर्चा सुरू झाली सोन्याच्या हंडीची

अल्लीपूर : अलमडोह येथे घराच्या खोदकामात सापडलेली पांढऱ्या धातूची नाणी.
अल्लीपूर : अलमडोह येथे घराच्या खोदकामात सापडलेली पांढऱ्या धातूची नाणी.

अल्लीपूर (जि. वर्धा) : अलमहोड येथे पडक्‍या घराचे खोदकाम करताना पांढऱ्या धातूची 134 नाणी आढळून आली आहेत. ही नाणी 1862 ते 1888 या काळातील असल्याचे त्यावरील मुद्रेवरून दिसून येते. घटनास्थळाचा पंचनामा करून नाणी जप्त करण्यात आली आहेत. याबाबत पुरातत्त्व विभागाला माहितीही देण्यात आली आहे.


अल्लीपूर जवळ असलेल्या अलमडोह येथे शरद नत्थू देशमुख यांच्या घराचे खोदकाम सुरू होते.
खोदकाम करताना मजुरांना एक चरवी सापडली.

सोन्याचा हंडा सापडल्याची चर्चा

मग गावात चर्चा पसरली की, सोन्याचा हंडा सापडला. या घटनेची माहिती तहसीलदार पवार यांना देण्यात आली. त्यांनी मंडळ अधिकारी गजानन म्हसाळे यांना चौकशीकरिता अलमहोड येथे पाठविले.
चौकशीत चरवीसह ही नाणी साळवे नामक व्यक्तीने नेल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर या व्यक्तीला पाचारण करण्यात आल्यानंतर कुटारात लपवून ठेवलेली चरवी काढून म्हसाळे यांच्या हवाली करण्यात आली.

जप्त नाणी ठाणेदाराला सुपूर्द

अलमहोड येथून जप्त केलेली नाणी अल्लीपूरचे ठाणेदार योगेश कामाले यांच्या सुपूर्द करण्यात आली आहे. ही नाणी सध्या अल्लीपूर ठाण्यात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शरद देशमुख यांच्या घराचे खोदकाम बंद ठेवण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. या घटनेची माहिती पुरातत्त्व विभागाला देण्यात आली आहे.

सोनार व्यावसायिकांकडून परीक्षण करणार

पुढील आदेशापर्यंत कोषागार उपलब्ध होतपर्यंत नाणी ठाण्यातच ठेवण्यात येणार आहेत. खोदकामात सापडलेली ही नाणी चांदीची की इतर कोणत्या धातूची, याविषयी सोनार व्यावसायिकांकडून परीक्षण करून घेतले जाणार आहे.

पुरातत्त्व विभागाला पत्र पाठविले
खोदकामात सापडलेली नाणी ही पांढऱ्या धातूची आहेत. ही नाणी जप्त करून अल्लीपूर पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आली आहे. पुरातत्त्व विभागाला पत्र पाठविले असून, संबंधित घराचे खोदकाम बंद ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे.
- गजानन म्हसाळे, मंडळ अधिकारी, अल्लीपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com