शेतकरी विधवांनी जाळला कंगना रनौतचा पुतळा; पांढरकवडामधील आंदोलनात व्यक्त केला संताप 

widows of farmers protest against Kangna Ranaut in Yavatmal district
widows of farmers protest against Kangna Ranaut in Yavatmal district

यवतमाळ: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री कंगना रनावत हिने पुन्हा एकदा शेतकर्‍यांना आतंकवादी संबोधल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, आज पांढरकवडा येथे शेतकरी विधवांनी कंगना रनौतचा पुतळा जाळून आपला संताप व्यक्त केला. यापुढे सर्व शेतकरी कंगना रनावतच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकणार असल्याची घोषणाही शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी विधवा दिल्ली येथील प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात तसेच शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आता, मात्र या आंदोलनात सहभागी झालेले सर्वच शेतकरी आतंकवादी असल्याचे वक्तव्य कंगना रनावत हिने केले आहे. हा शेतकर्‍यांचा अपमान असल्यामुळे आज पांढरकवडा येथे कंगनाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यानंतर कंगनाचा पुतळा जाळून तिचा निषेध करण्यात आला. 

याप्रसंगी शेतकरी नेते किशोर तिवारी, समाजसेवक स्मिता तिवारी, शेतकरी विधवा भारती पवार, पौर्णिमा कोपुलवार, कविता सिद्म, लक्ष्मी गिरीवार, राम ठमके, वंदना मोहर्ले, रेखा गुरनाळे, अपर्णा मलिकर, योगिता चौधरी, माजी नगरपालिका अध्यक्ष अनिल तिवारी, अंकित नैताम, सुनील राऊत, सुरेश तलमले, नीलेश जयस्वाल, मनोज चव्हाण, संदीप जाजुलवार, चंदन जैनकर, प्रदीप कोसरे, बबलू धुर्वे, आशुतोष अंबाडे उपस्थित होते.

शेतकरी कायद्याविरोधात शनिवारी (ता. सहा) विविध शेतकरी संघटनांची भारत बंद पुकारला आहे.  नागरिकांनी या दिवशी दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडू नये.
-किशोर तिवारी
शेतकरी नेते, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com