esakal | वन्यप्राण्यांनी आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; शेतपिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी
sakal

बोलून बातमी शोधा

Wild Animals continuously attacking farmers farm

पांढरी, हलबीटोला व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नागझिरा अभयारण्याला लागून आहेत. या अभयारण्यात रानडुक्कर, अस्वल, रानगवे, यासह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे.

वन्यप्राण्यांनी आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी; शेतपिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी

sakal_logo
By
मुनेश्‍वर कुकडे

पांढरी (जि. गोंदिया) ः सडक अर्जुनी तालुक्‍यातील पांढरी, हलबीटोला परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतजमिनी जंगलव्याप्त भागात आहेत. या जंगलातील वन्यप्राणी शेतात शिरून पिकाची नासाडी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, वनविभाग वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

पांढरी, हलबीटोला व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी नागझिरा अभयारण्याला लागून आहेत. या अभयारण्यात रानडुक्कर, अस्वल, रानगवे, यासह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे. हे वन्यप्राणी शेतात शिरून पिकाची नासाडी करीत आहेत. वन्यप्राण्यांचा धुमाकूळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. 

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू 

प्राणी मनसोक्त शेतात फिरून शेतपिकांची नासाडी करीत असतात. परंतु, शेतकरी भीतीपोटी वन्यप्राण्यांच्या नादी लागत नाहीत. वन्यप्राण्यांचा वाढता धुमाकूळ पाहता शेतकऱ्यांनी वनविभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या. बंदोबस्त करण्याची मागणी केली. परंतु, अजूनही वनविभागाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत.

हलबीटोला येथील ओंकार शेंडे यांची हलबीटोला परिसरात गट क्रमांक 216 , 035 आर. शेतजमीन असून, यावर त्यांनी धानपिकाची लागवड केली होती. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे जमीन ओली असल्याने धानपिकाची कापणी त्यांनी अद्यापही केली नाही. अशात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालून धानपिकाची नासाडी केली आहे. दरम्यान, वनविभागाने दखल घेऊन वन्यप्राण्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

परतीच्या पावसाचा फटका

यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली. मात्र, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. कित्येक शेतकऱ्यांच्या कडपा पाण्यात सापडल्या. बहुतेक कडपांना कोंब फुटले होते.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

परतीच्या पावसामुळे जमीन ओली होती. त्यामुळे धान कापणी करता आली नाही. परंतु, वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे माझ्या शेतातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाने मला तत्काळ आर्थिक मदत करावी.
-ओंकार शेंडे,
 शेतकरी, हलबीटोला.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image