esakal | काँग्रेसचे मजबुतीकरण की भाजप, राष्ट्रवादीला शह?
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेसचे मजबुतीकरण की भाजप, राष्ट्रवादीला शह?

काँग्रेसचे मजबुतीकरण की भाजप, राष्ट्रवादीला शह?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : अमरावतीच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते डॉ. सुनील देशमुख (Dr. Sunil Deshmukh) यांचे स्वगृही परतने काँग्रेसजनांसाठी (Congress) किती समाधानाची बाब आहे, हे कालांतराने स्पष्ट होईल. मात्र, सध्या तरी भाजपसोबत राष्ट्रवादीला शह देणे हा उद्देश यामागे असल्याचे दिसून येत आहे. (With-the-return-of-Sunil-Deshmukh-to-the-Congress,-the-Congress-will-be-stronger)

अमरावती मतदारसंघात आमदार जरी काँग्रेसचा असला तरी राष्ट्रवादीचे पर्यायाने खोडके दाम्पत्याचे वाढते वर्चस्व काँग्रेसला चांगलेच बोचणारे ठरू लागले असल्याचे बोलले जात आहे. विद्यमान राजकीय स्थितीत डॉ. देशमुख यांचे काँग्रेसमध्ये पुनर्वसन करायचे तर पक्षात वजनदार पद द्यावे लागणार आहे. प्रदेश कार्याध्यक्ष या पदासोबतच एखाद्या राज्याचे प्रभारी पद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

जिल्ह्याच्या राजकारणात डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने किती उलथापालथ होईल, हे सध्या स्पष्ट नसले तरी शहराच्या राजकारणावरील पकड काँग्रेससाठी फायद्याची ठरू शकेल. महापालिकेत त्यांच्या गटाचे नगरसेवक अधिक असून त्यामुळेच भाजपची तेथे एकहाती सत्ता आहे. डॉ. देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशाने सभागृहात मनपाला हादरा बसण्यासोबतच पुढील वर्षी होणाऱ्या मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला नुकसान होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

भाजपपेक्षा अधिक प्रमाणात काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खोडकेंची भीती वाटत आहे. राष्ट्रवादीतून खोडकेंना निष्कासित केल्यानंतर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसह विधानसभा निवडणुकीत पक्षाची काय गत झाली व त्यांना परत घेतल्यानंतर काय बदल घडले, हे काँग्रेससह सर्वच पक्षांनी अनुभवले आहे.

हेही वाचा: वाढदिवसापूर्वीच 'ती' निघून गेली, आईने फोडला टाहो

शहरात संजय खोडके यांच्या सहचारिणी सुलभा खोडके काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अमरावती मतदारसंघ आघाडी असताना व मागणी करूनही राष्ट्रवादीला दिला नाही. नाइलाजाने सुलभा खोडके काँग्रेसच्या उमेदवार झाल्या. त्यामुळे राजकीय व्‍यासपीठावर या विषयाचीसुद्धा चर्चा परत सुरू झाली आहे.

का सोडली भाजपची साथ?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या मजबूत नेत्याची साथ सोडून डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये का परतत आहेत, यावर चर्चा रंगली आहे. राज्यात सत्ता असताना व सिनिअर आमदार असतानाही डावलून मंत्रिपदाची माळ दुसऱ्या सदस्याच्या गळ्यात घालण्यात आली. पक्षात बाहेरून आलेले, मोदी लाटेमुळे निवडून आले अशाप्रकारच्या चर्चांनी ते कंटाळले होते. भाजपमध्ये भविष्य दिसत नाही. काँग्रेसी वातावरणात वाढलेल्या डॉ. सुनील देशमुख यांना भाजपचे वातावरण कधीच मानवले नाही. अखेर ते स्वगृही परतण्याचा निर्णयाप्रत आले, असे बोलले जात आहे.

(With-the-return-of-Sunil-Deshmukh-to-the-Congress,-the-Congress-will-be-stronger)

loading image
go to top