बाप रे! महिला चालवत होती चक्क गांजा तस्करीचे नेटवर्क; तब्बल सात लाखांचा गांजा जप्त 

संतोष ताकपिरे 
Monday, 28 September 2020

6 लाख 96 हजार रुपयांचा गांजा, एमएच 27 बीए 3826 क्रमांकाची 30 हजारांची एक दुचाकी, 22 हजारांचा मोबाईल असा एकूण सात लाख 48 हजारांचा माल कारवाई करणाऱ्या पथकाने जप्त केला. 

अमरावती ः ग्रामिण भागात गांजातस्करीचे नेटवर्क एक महिला चालवीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. महामार्गावरील एजंटच्या माध्यमातुन माल पुरवठा करण्याचा प्रयत्न करताना त्या महिलेसह दोन साथीदार अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

6 लाख 96 हजार रुपयांचा गांजा, एमएच 27 बीए 3826 क्रमांकाची 30 हजारांची एक दुचाकी, 22 हजारांचा मोबाईल असा एकूण सात लाख 48 हजारांचा माल कारवाई करणाऱ्या पथकाने जप्त केला. 

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे?, चक्क कपाशीच्या शेतात घेतले गांजाचे पीक

पोलिस अधीक्षक डॉ. हरिबालाजी एन यांच्या विशेष पथकाने तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. आपल्या हद्दीतून गांजातस्करी सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळू नये याचेच आश्‍चर्य वाटते.

अरविंद आत्माराम मोहोड (वय 55, रा. चांदुररेल्वे) व सूरज अजय नगरडे (वय 22, रा. धामक) व सुलतानपूर येथील नंदा जाधव अशी अटक तिघांची नावे असल्याचे विशेष पथकाचे पोलिस निरीक्षक अजय आखरे यांनी सांगितले.

जप्त गांजा, अटक तिघांना या पथकाने पुढील कारवाईसाठी तळेगाव दशासर पोलिसांच्या स्वाधीन केले. तेथेच तिघांविरुद्ध एनडीपीएस ऍक्‍ट अन्वये शनिवारी (ता 27) गुन्हा दाखल झाला. महामार्गालगत सुलतानपूर वरुन यवतमाळ, अमरावतीसह आसपासच्या जिल्ह्यातील एजंटजवळ सदर महिला गांजाचा पुरवठा करीत होती.

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बरसणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज 

महिलेविरुद्ध ओरिसा, कर्नाटकात गुन्हे

बाहेर राज्यामधुन गांजा आणून विदर्भातील काही जिल्ह्यात तस्करी होते. याप्रकरणात अटक महिलेस यापूर्वी वर्धा, ओरिसा, कर्नाटक येथे अटक झाली होती. असे सहाय्यक पोलिस निरीक्षक अजय आखरे यांनी स्पष्ट केले. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman arrested for running network of drugs