वैद्यकीय महाविद्यालयाच्या बंद लिफ्टमधून आली दुर्गंधी आणि... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

अधिष्ठातांच्या कक्षाच्या बाजूलाच लिफ्ट आहे. त्या लिफ्टमधून दुर्गंधी येत असल्याने कर्मचार्‍यांनी जवळ जाऊन बघितले. त्यावेळी लिफ्टच्या खाली मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठले. सदर महिलेचा मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बंद असलेल्या लिफ्टमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी (ता.11) दुपारी बाराच्या दरम्यान उघडकीस आली. या घटनेमुळे रुग्णालयात खळबळ उडाली असून, घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

अधिष्ठातांच्या कक्षाच्या बाजूलाच लिफ्ट आहे. त्या लिफ्टमधून दुर्गंधी येत असल्याने कर्मचार्‍यांनी जवळ जाऊन बघितले. त्यावेळी लिफ्टच्या खाली मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच यवतमाळ शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठले. सदर महिलेचा मृतदेह चार ते पाच दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मारहाण करून आणून टाकले
अधिष्ठातांच्या कार्यालय परिसरात दिवसभर डॉक्टर, नर्सेस, कर्मचार्‍यांची वर्दळ असते. आयसीयू कक्षदेखील याच परिसरात आहे. सुरक्षारक्षकदेखील नेहमीच तैनात असतात. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावण्यात आलेले आहेत. ही लिफ्ट तीन महिन्यांपासून बंद असल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले. लिफ्टखाली मृतदेह आला कसा, महिला वरील माळ्यावरून खाली पडली की, मारहाण करून तिला येथे आणून टाकले, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.

अनोखा विक्रम, कुटुंबासह पोहून पार केले 16 किलोमीटरचे अंतर

या घटनेचे रहस्य उलगडण्यासाठी परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 
असे आहे वर्णन
लिफ्टमध्ये मृतावस्थेत आढळून आलेली महिला 50 ते 60 वयोगटातील आहे. रंग सावळा असून, चेहरा कुजलेला आहे. अंगात पिवळ्या रंगाचे स्वेटर तर पांढरी हिरवी साडी परिधान केलेली आहे. असे वर्णन पोलिसांनी जारी केलेल्या शोधपत्रिकेत आहे. कुणाला माहिती असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन शहरचे ठाणेदार धनंजय सायरे, सपोनि रामकृष्ण भाकडे, पीएसआय आशीष बोरकर यांनी केले आहे.

सावधान! बेरोजगारांना फसविणाऱ्या टोळ्या सक्रीय  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women dead body found in lift yavatmal