दुचाकीस्वारांचा चेहरा कपड्याने झाकलेला, शिवाय नंबरप्लेट कोरी; सोनसाखळी हिसकावल्यानंतर महिला घाबरली

संतोष ताकपिरे
Friday, 27 November 2020

दुचाकीस्वारांनी कपड्याने स्वत:चा चेहरा झाकला होता. शिवाय दुचाकीची नंबरप्लेट कोरी होती. त्यामुळे सोनसाखळी हिसकावल्यानंतर महिला घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत चेनस्नॅचर तेथून फरार झाले. मनीषा बुंदे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.

अमरावती : दिवाळीच्या सुट्यांमध्ये आपल्या बहिणीकडे आलेली महिला फोनवर बोलत असताना दुचाकीस्वारांनी तिची सव्वा लाखांची सोनसाखळी हिसकावली.

गुरुवारी (ता. २६) दुपारी सव्वादोनच्या सुमारास गाडगेनगरहद्दीत समता कॉलनी परिसरात ही घटना घडली. मनीषा बुंदे (रा. कवठा बाजार) ही महिला समता कॉलनीत राहणाऱ्या बहिणीच्या घरी आली. दुपारी घरासमोरच मोबाईलवर बऱ्याच वेळेपर्यंत बोलत होत्या. दुचाकीवर असलेल्या दोघांनी हीच बाब हेरली. महिलेच्या जवळ जाऊन बेसावध असल्याचे बघून ३० ग्रॅमची एक लाख २५ हजारांची सोनसाखळी जबरीने हिसकावून पळ काढला.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण?

दुचाकीस्वारांनी कपड्याने स्वत:चा चेहरा झाकला होता. शिवाय दुचाकीची नंबरप्लेट कोरी होती. त्यामुळे सोनसाखळी हिसकावल्यानंतर महिला घाबरली. तिने मदतीसाठी आरडाओरड केली. परंतु, तोपर्यंत चेनस्नॅचर तेथून फरार झाले. मनीषा बुंदे यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गाडगेनगर पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात नाकाबंदी केली. सराईतांची चौकशी आरंभिली. परंतु, दुचाकीस्वाराचा शोध लागू शकला नाही.

सविस्तर वाचा - व्हॉट्‌सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

घटनेनंतर पोलिसांनी समता कॉलनीतील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एका दुचाकीवर दोघे युवक जाताना दिसले. परंतु, चेहरा झाकलेला असल्याने तसेच नंबरप्लेटही कोरी असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens gold chain thief in Amravati

Tags
टॉपिकस
Topic Tags: