
अमरावती ः सहकार विभागाकडून अद्याप निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी शिक्षक बॅंकेच्या निवडणुकीचे राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. जिल्हापरिषद कर्मचारी युनियनच्या वतीने अनेकांनी दावेदारी ठोकल्याने संघटनेत फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच आता सर्वसंमतीने उमेदवार ठरविण्यासाठी एक संयुक्त बैठक बोलविण्याच्या हालचाली जिल्हापरिषदेत सुरू झाल्या आहेत.
जिल्हापरिषद शिक्षक सहकारी बॅंकेत जवळपास 10 हजार सभासदांचे मतदान असून त्यापैकी जवळपास 1500 एक गठ्ठा मतदान जिल्हापरिषद कर्मचाऱ्यांचे आहे. जिल्हा परिषद कर्मचारी युनियन ज्या उमेदवाराच्या पाठीशी उभी तो उमेदवार हमखास विजयी, असे या निवडणुकीचे सूत्र आहे. मागील वेळी ज्ञानेश्वर घाटे यांना युनियनच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात आली व ते निवडूनसुद्धा आलेत. मात्र यंदा अनेकांच्या राजकीय आकांक्षा जागृत झाल्या आहेत.
युनियनचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली असतानाच याच संघटनेतील दुसऱ्या एका गटाने समीर चौधरी यांची उमेदवारी जाहीर केली. तसेच मागील वेळी उमेदवारी न मिळाल्यानंतरही रिंगणात उतरलेल्या वाहन चालक संघटनेचे गजानन जुनघरे यांनीसुद्धा तयारी सुरू केली. मागील वेळी आपल्याला थांबण्यास सांगितले व आपण संघटनेचा शब्द मानला, असे सांगत समीर चौधरी यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे.
एकमत होत नसल्याने युनियनमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ही फूट टाळण्यासाठी युनियनच्या बॅनरखाली एक सभा आयोजित करून त्या सभेमध्ये युनियनच्या उमेदवारावर एकमत व्हावे, असे प्रयत्न पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहेत. लवकरच सभेची घोषणासुद्धा केली जाणार आहे.
नक्की वाचा - उधारीच्या पैशांचा वाद विकोपाला, भरदुपारी घडला थरार
उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांकडून त्या सभेत मत मागविले जाईल. सदस्यांच्या परवानगीने सर्वांना चालू शकणारा एकच उमेदवार ठरविण्याचा आमचा प्रयत्न राहील.
-पंकज गुल्हाने,
अध्यक्ष, जि. प. कर्मचारी युनियन.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.