बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतील केंद्रीय बालविकास मंत्री स्मृती इराणी यांची भेट; केली ही मागणी

Yashomati Thakur says the Center should provide funds as per the revised plan
Yashomati Thakur says the Center should provide funds as per the revised plan

अमरावती : केंद्र सरकारने एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पूरक पोषण कार्यक्रमासाठी सन २०२०-२१ साठी दोन हजार तीन कोटी ९१ लाख रुपयांच्या सुधारित आराखड्यास मान्यता देऊन तातडीने निधी द्यावा, अशी मागणी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना भेटून केली आहे.

राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या केंद्रीय मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या विषयांच्या अनुषंगाने मंत्री ॲड. ठाकूर यांनी नवी दिल्ली येथे श्रीमती इराणी यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्रा, सचिव श्रीमती इद्‌झेस कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो, आयुक्त डॉ. ऋषिकेश यशोद आदी उपस्थित होते.

एप्रिल २०२० पासून पूरक पोषण कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांच्या संख्येत सात लाख २७ हजारांहून अधिकची वाढ झाली असून, अधिकच्या निधीची तरतूद करणे आवश्‍यक झाले आहे. त्यासाठी सुधारित दोन हजार तीन कोटी ९१ लाख रुपयांचा सुधारित वार्षिक प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंत्री ठाकूर यांनी श्रीमती इराणी यांच्याकडे सुपूर्त करून त्यास मान्यता देण्याची विनंती केली. राज्य सरकारने या कार्यक्रमासाठी यावर्षी एक हजार सातशे कोटी रुपयांची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार पोषण कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण योजना राबविण्यासाठी राज्याला ५५४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य सराकरने त्यासाठी २७७ कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. तथापि, केंद्र सरकारने अद्याप तरतूद वितरित केली नाही. पूरक पोषणासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेणे शक्‍य व्हावे यासाठी हा निधी तातडीने मिळणे आवश्‍यक आहे, असेही ॲड. ठाकूर यांनी मंत्री श्रीमती इराणी यांना सांगितले.

निधी वेळेत मिळणे अत्यंत आवश्‍यक
कोरोना परिस्थितीमुळे लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे सुधारित आराखडा करणे भाग पडले आहे. पूरक पोषण कार्यक्रम सुरळीत ठेवण्यासाठी हा निधी वेळेत मिळणे अत्यंत आवश्‍यक आहे.
- ॲड. यशोमती ठाकूर,
महिला व बालविकास मंत्री

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com