महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, यशोमती ठाकूर यांचे सूचक ट्विट

yashomati thakur tweet to warn mahavikas aghadi leader in amravati
yashomati thakur tweet to warn mahavikas aghadi leader in amravati

अमरावती : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिक मांडली होती. त्यावरून काँग्रेसचे नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच काँग्रेस कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी पवारांच्या नावाचा उल्लेख टाळत ट्विट करून महाविकास आघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तेव्हापासून या तिन्ही पक्षांमधील अंतर्गत वाद नेहमीच समोर आले आहेत. एकमेकांच्या पक्षातील नेत्यांवर टीका केल्याचे यापूर्वी सुद्धा घडले आहे. सध्या काँग्रेसचे नेते राहुल गांधींविषयी करण्यात आलेल्या टीकेमुळे काँग्रेसनं मौन सोडत महाआघाडीतील नेत्यांना इशारा दिला आहे.

महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली आहे. 'आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आले आहेत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की, हे सरकार स्थिर राहावं, असं वाटत असेल, तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावे. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं. काँग्रेसचं नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे' , असं म्हणत ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना सूचक इशारा दिला आहे.

काय म्हणाले होते शरद पवार -
एका मुलाखतीत शरद पवार यांना राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवारांनी राहुल गांधींच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केला होता. 'हे गरजेचं नाही की, सगळ्यांचेच विचार स्वीकारले पाहिजेत. मी देशातील नेतृत्वाविषयी भाष्य करू शकतो, इतर देशातील नाही. सीमांचं पालन केलं गेलं पाहिजे. कोणत्याही पक्षाचे नेतृत्व यावर अवलंबून असतं की, त्यांना पक्षामध्ये कशा पद्धतीने स्वीकारले जात आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये सातत्याचा अभाव आहे,' असे पवार म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com