esakal | वैदर्भीयन गारठले; नागपुरात पारा ८.४ अंशांवर, तर गोंदियासह यवतमाळात सर्वात कमी तापमानाची नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

yavatmal and gondia temperature falls to 7 degree celsius

जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे दोन दिवसांपासून विदर्भात कडाक्याची थंडी जाणवत आहे. गारठ्यामुळे पाऱ्यात दिवसेंदिवस घसरण होत आहे. परवा १६.३ अंशांवर गेलेला नागपूरचा पारा दोन दिवसांत तब्बल आठ अंशांनी घसरला.

वैदर्भीयन गारठले; नागपुरात पारा ८.४ अंशांवर, तर गोंदियासह यवतमाळात सर्वात कमी तापमानाची नोंद

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर : विदर्भात उशिरा का होईना थंडीची तीव्र लाट आली. नागपूरसह सर्वच शहरांमध्ये कडाका वाढला असून, यंदाच्या मोसमात उपराजधानीचा पारा प्रथमच ८.४ अंशांपर्यंत घसरला आहे. या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे. 

हेही वाचा - Exclusive : अंथरुणाला खिळलेल्या 'सुनील'च्या मदतीसाठी सरसावले हात; कुणी रोख...

जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे दोन दिवसांपासून विदर्भात कडाक्याची थंडी जाणवत आहे. गारठ्यामुळे पाऱ्यात दिवसेंदिवस घसरण होत आहे. परवा १६.३ अंशांवर गेलेला नागपूरचा पारा दोन दिवसांत तब्बल आठ अंशांनी घसरला. आज हवामान विभागाने नोंदविलेले ८.४ अंश सेल्सिअस तापमान यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी ठरले. विदर्भात सर्वांत कमी तापमानाची नोंद गोंदिया आणि यवतमाळ येथे ७ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली आहे. 

हेही वाचा - Success Story : लागवड एकदाच अन् उत्पादन ३५ वर्ष, दरवर्षी कमावतोय लाखोंचा नफा

हवेतील गारठ्यामुळे दिवसभर हुडहुडी जाणवते. सायंकाळ होताच गारठा वाढू लागतो. थंडीचा सर्वाधिक प्रभाव ग्रामीण भागांत जाणवत आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्याचा आधार घ्यावा लागत आहे. सकाळच्या सुमारास दाट धुकेही पसरलेले दिसतात. उत्तर भारतात बर्फवृष्टी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने, विदर्भातही थंडीचा मुक्काम लांबणार आहे. नववर्षापर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी २९ डिसेंबर रोजी नागपूरचा पारा ३.५ अंशांपर्यंत घसरला होता. थंडीचा जोर आणि दिवसेंदिवस तापमानात होत असलेली घट लक्षात घेता, तो विक्रम इतिहासजमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय हवामान विभागाने यंदा कडाक्याच्या थंडीचा यापूर्वीच इशारा दिलेला आहे. 
 

loading image