मुलीने आईला फोन करून सांगितले मी लग्न केले; मात्र, इतक्या लाखांमध्ये झाला होता सौदा...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 25 June 2020

अल्पवयीन मुलीच्या आईने ३० एप्रिलला मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार वणी  पोलिस ठाण्यात दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला. ठाणेदार वैभव जाधव यांच्या  मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निखिल फटींग, माया चाटसे, अमोल नुनेलवार,  अविनाश बनकर यांनी तपासाला सुरुवात केली.

वणी (जि. यवतमाळ) : अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा फायदा घेत हिंगणघाट येथील  मायलेकाने तिची राजस्थान येथील भिलवाडा या गावातील व्यक्तीला चार लाखांत विक्री  केली. या मायलेकाने त्याच्याशी लग्नही लावून दिले. ही धक्कादायक घटना उघडकीस  आल्यावर वणी पोलिसांनी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे.

पांढरकवडा तालुक्‍यातील पहापळ येथील अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी वणी येथे  आजी-आजोबांकडे राहत होती. गेल्या २५ जानेवारीला ती पहापळ येथे जाण्याकरिता  निघाली. मात्र, ती गावी न पोहोचता तिने थेट हिंगणघाट गाठले. सदर अल्पवयीन मुलगी  उत्कृष्ट नृत्यांगना असल्याने हिंगणघाट येथील नृत्यप्रशिक्षक प्रदीप ऊर्फ राहुल वाकडे (वय  ३६) याच्याकडे गेली होती.

क्लिक करा - पत्नीच्या जळत्या चितेवर पतीची उडी, सुखी जीवनाचा दुर्दैवी अंत

राहुल व त्याची आई सरस्वती या दोघांनी मिळून तिला फुस लावले. राजस्थानात  असलेल्या भिलवाडा गावातील दिनेश मुलचंद शर्मा (वय २९) या तरुणाशी चार लाख  रुपयांत तिचा सौदा केला आणि त्याच्यासोबत लग्न लावून दिले. मुलीने आईला फोन करून लग्न केल्याचे सांगितले.

अल्पवयीन मुलीच्या आईने ३० एप्रिलला मुलीला फूस लावून पळविल्याची तक्रार वणी  पोलिस ठाण्यात दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला. ठाणेदार वैभव जाधव यांच्या  मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक निखिल फटींग, माया चाटसे, अमोल नुनेलवार,  अविनाश बनकर यांनी तपासाला सुरुवात केली.

असे का घडले? - भीषण अपघात : ट्रकने दुचाकीस्वाराला पाचशे मिटर नेले फरफटत; अंगावरचे कपडेही...

हिंगणघाट येथे या प्रकरणाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. हिंगणघाट येथून वाकडे या  मायलेकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, मुलीची चार लाखांत विक्री केल्याचे  स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी दिनेशसोबत संपर्क केला.

दिनेशने त्या अल्पवयीन  मुलीसह वणी पोलिसांत शरणागती पत्करली आहे. पोलिसांनी दिनेश शर्मा, प्रदीप वाकडे व  सरस्वती वाकडे यांना ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता, येत्या ३०  जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जाणून घ्या - नवविवाहितेचा सासूसोबत झाला वाद; 'तुमचे काम करून देतो' असे म्हणतं प्रीती दासने केली ही मागणी...

असे किती प्रकार केले?

काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर शहरात मुलींच्या विक्री रॅकेटचा भंडाफोड पोलिसांनी केला होता.  हिंगणघाट येथील मायलेकाने या अल्पवयीन मुलीला चार लाख रुपयांत विकले होते.  त्यामुळे यापूर्वीसुद्धा असा प्रकार केला का, हे तपासण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. कसून तपास केल्यास मोठे घबाड हाती लागण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yavatmal district girl's deal for four lakhs