यवतमाळः पैनगंगा नदीवर अपघात; तीन मृत्युमुखी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मृतांमध्ये आमदार अनिल गोटे यांच्या बंधूचा समावेश

ऊमरखेड (यवतमाळ): नागपुरवरून परभणीकडे जाणार्‍या एका मोटारीला पैनगंगा नदीवर समोरून येणार्‍या ट्रकने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की मोटार नदीपात्रामध्ये जाऊन कोसळली. या अपघातात तीन जण जागीच मृत्यमुखी पडले आहेत. मृतांमध्ये भाजपाचे आमदार अनिल गोटे यांचे धाकटे बंधू व भावजयीचा समावेश आहे. अपघात आज (शुक्रवार) हदगाव-उमरखेड रस्त्यावरील पैनगंगानदीवर घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्युमुखी पडलेले ज्ञानेश्‍वर गोटे हे परभणी येथे भुमापन अधिमोटारी म्हणून मोटार्यरत असत. नागपुरवरून परभणीकडे निघाले असता, मराठवाडा-विदर्भाला जोडणार्‍या पैनगंगा पुलावर मोटार जात असताना समोरून येणार्‍या अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली. समोरून येणार्‍या ट्रकचा वेग इतका होता, की मोटार पुलावरून कोसळून नदीपात्रात जाऊन पडली. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग नव्हता. त्यामुळे मोटार पुढे जाऊ शकली नाही.

अपघातात झाल्याचे या मार्गावरून जाणार्‍या वाहनचालकांनी पाहिले. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. तेथील नागरिक व पोलिसांच्या मदतीने मोटारमधील नागरिकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तत्पर्वूीच सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता. या वेळी कागदपत्रांची तपासणी केली, असता मृतांची ओळख पटू शकली.

मृतांमध्ये परभणी येथे भुमापन अधिमोटारी असलेले ज्ञानेश्‍वर उमराव गोटे त्यांची पत्नी रत्ना ज्ञानेश्‍वर गोटे व चालकाचा समावेश आहे. चालकाचे नाव समजू शकले नाही. पोलिसांनी तिघांचे मृतदेह हदगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. पोलिसांनी अपघाताची माहिती धुळे येथे त्यांच्या नातेवाईकांना दिल्याचे सांगण्यात आले.

ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
पोलिसानेच हिसकावले भिकाऱ्याचे पैसे
गणेशाची व्रते 
उत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक
शिक्षण सोडून 'तो' बनला दहशतवादी
खासगीपणाच्या हक्काला आधार (अग्रलेख)
महिलांकडून परिवर्तनाचा ‘श्रीगणेशा’
बाप्पा... लौकर या! (ढिंग टांग!)
शांतता सुळावर? 
ध्वनिक्षेपक वापरात गणपतीत चार दिवस सूट 

Web Title: yavatmal news accident in umarkhed three killed