हा काय प्रकार? "त्याने' मारहाणही केली अन्‌ दिले चाळीस रुपये!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली. इतकेच नाही तर, जखमी झाल्यानंतर उपचार करण्यासाठी चाळीस रुपयेदेखील दिल्याची आपबिती जखमी विद्यार्थ्याच्या मित्राने सांगितली. घटनेची माहिती नातेवाइकांना मिळताच त्यांनी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठले. वृत्तलिहेस्तोवर या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नव्हती. 

यवतमाळ : एकाच वर्गात शिक्षण घेत असल्याने एक विद्यार्थी चिडवायचा. अरे चिडवू नको, म्हटल्याने वाद विकोपाला गेला. मोकळ्या मैदानात विद्यार्थ्याला जबर मारहाण करण्यात आली. विद्यार्थी जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी चाळीस रुपये दिले. घटनेची माहिती नातेवाइकांना मिळताच त्यांनी अवधूतवाडी पोलिसांत धाव घेतली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील परिसरात इंग्रजी माध्यमाची नामांकीत शाळा आहे. ही शाळा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. इयत्ता नववीत दोघेही विद्यार्थी शिक्षण घेतात. तू छक्का...तू छक्का... म्हणून विद्यार्थी चिडवायचा. हा अपमान नेहमीच होत असल्याने असे चिडवू नको, असे म्हटले. मी चिडवणार, तू काय करतो...एकमेकांना धमक्‍या दिल्या. आज दुपारी चारदरम्यान विद्यार्थी मित्रांसह शनिमंदिर चौकातील एका मैदानात उभा होता. चिडवणारा विद्यार्थी तेथे आला आणि विद्यार्थ्याला मारहाण करायला सुरुवात केली.

विद्यार्थी जखमी : नातेवाइकांची पोलिसांत धाव
इतर मित्रांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली. इतकेच नाही तर, जखमी झाल्यानंतर उपचार करण्यासाठी चाळीस रुपयेदेखील दिल्याची आपबिती जखमी विद्यार्थ्याच्या मित्राने सांगितली. घटनेची माहिती नातेवाइकांना मिळताच त्यांनी अवधूतवाडी पोलिस ठाणे गाठले. वृत्तलिहेस्तोवर या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नव्हती. 

जॉनी लिव्हर म्हणातात, नागपूरचे लोक लय भारी
 

दप्तरात आढळले होते चाकू 
इंग्रजी माध्यमाची शाळा नेहमीच चर्चेत राहते. काही वर्षांपूर्वी विद्यार्थ्यांच्या दप्तरात चाकू आढळून आले होते. प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचलल्यानंतर दम देऊन विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आले होते. त्यानंतर फटाके फोडण्यास विरोध केल्याने शिक्षकाला विद्यार्थ्याने मारहाण केली होती. नामांकीत शाळेतील विद्यार्थी गुन्हेगारी वृत्तीने का वागतात, हा प्रश्‍न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

जेव्हा पोलिसच करतो अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न... 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yavatmal student bruitly beaten at school