esakal | ...अन् दर्शनासाठी 25 किलोमीटरचा प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

pravas

होळीच्या दिवशी गजबजलेला 5 ते 7 लाखांच्यावर भाविकांचा जमावडा (ता.9) कोरोना प्रभावामुळे तुरळक दिसून आला. सर्वधर्मीयाचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाची यात्रा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ होती. प्रशासनाने गेल्या आठवडाभरापासून कायदा व सुव्यवस्था राखत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व उपाययोजना केली होती. धाड, बुलडाणा, चिखली, हातणी या सर्व रस्त्यावर नाकाबंदी केल्यामुळे त्या नाक्यावर भाविकांचे आलेले वाहने पोलिसांनी परत केले.

...अन् दर्शनासाठी 25 किलोमीटरचा प्रवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव सराई (जि. बुलडाणा) : देशासह विदेशात प्रसिद्ध असलेल्या बाबा सैलानी यांची होळी यात्रेवर कोरोना व्हायरसचे संकट असल्यामुळे प्रशासनाच्यावतीने रद्द करण्यात आली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त, 8 ठिकाणी नाकाबंदी आणि प्रशासनाने परत जाण्याचे केलेले आवाहन असे अडथळे दूर करत सैलानी बाबा यांच्यावर असलेली सर्वधर्मीयाची श्रद्धा पाहता शेकडो किलोमीटर अंतर कापून आलेल्या भाविकांनी दर्ग्यापासून 25 ते 30 किलोमीटर डेरे टाकत पायदळ जंगलातून सैलानी येथे दाखल होत बाबाचे शांततेत दर्शन घेऊन माघारी फिरल्याचे चित्र दिसून आले. यावेळी वेळोवेळी पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या सूचनेचेही पालन करताना भाविक दिसून आले.

क्लिक करा - महत्त्वाकांक्षी ‘जिगाव’ प्रकल्पास हवाय निधी; अधिवेशनात नाराजी

अनेक ठिकाणी केली आहे नाकाबंदी
होळीच्या दिवशी गजबजलेला 5 ते 7 लाखांच्यावर भाविकांचा जमावडा (ता.9) कोरोना प्रभावामुळे तुरळक दिसून आला. सर्वधर्मीयाचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाची यात्रा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ होती. प्रशासनाने गेल्या आठवडाभरापासून कायदा व सुव्यवस्था राखत भाविकांना त्रास होऊ नये म्हणून सर्व उपाययोजना केली होती. धाड, बुलडाणा, चिखली, हातणी या सर्व रस्त्यावर नाकाबंदी केल्यामुळे त्या नाक्यावर भाविकांचे आलेले वाहने पोलिसांनी परत केले. परंतु, काही भाविकांनी चिखली परिसरात वाहन उभे करुन शेतातून जंगलाची वाट पकडत पायदळ वाटेने रस्ता कापत सैलानी दर्ग्यावर दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. काही भाविकांनी तर तब्बल 25 ते 30 किलोमीटर अंतर पायदळ कापत सैलानी बाबांवर असलेली श्रद्धा दाखवीत दर्शन घेतले. 

हेही वाचा - कोरोनाची धडकी; कार्यक्रमांना कात्री


संदलकडे असणार सर्वांचे लक्ष
काही भाविकांनी पिंपळगाव सराई माळावरील शेतामध्ये झाडांचा आश्रय घेऊन त्याच ठिकाणी कदोरी करून तेथेच सैलानी बाबाचा नवस फेडला. एकूणच जिल्हाधिकारी सुमन चंद्रा आणि पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या नियोजनानुसार सैलानी यात्रेतून कोरोना प्रभावित न होता शांतता कायम ठेवण्यात यश आल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, 13 मार्चला निघणाऱ्या संदलकडे सर्वांचे लागले असून, सैलानीत होळी पेटली नसली तरी, संदल कडे लक्ष लागले आहे. दरम्यान, येत्या काही दिवस ही बंदी कायम राहणार असून, यासाठी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, एसपी डॉ. दिलीप भुजबळ यांच्या मार्गदर्शनात एडीएसपी संदीप पखाले, एसडीपीओ रमेश बरकते, एसडीओ (महसूल) राजेश्‍वर हांडे, तहसीलदार संतोष शिंदे, रायपूर ठाणेदार सुभाष दुधाळ, पथकातील नायब तहसीलदार अमरसिंग पवार, श्रीमती नैलाम, विद्या गौर, देशमुख, भांबळे, किशोर मोरे, अशोक शेळके, सदानंद हिवाळे, गणेश वानखेडे, नंदकिशोर उगले, ज्योती मगर, एएसआय यशवंत तायडे, विजय पैठणे, अमोल गवई, श्रीकांत चिटवार आदींची उपस्थित राहणार आहे.

होळी परिसरात सन्नाटा
दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी दर्गा व होळी ज्या ठिकाणी पेटविण्यात येते तो परिसर भाविकांनी गजबजलेला आसायचा. परंतु, यंदा कोरोना प्रभावामुळे यात्राच रद्द झाल्याने सैलानी यात्रा परिसरात सन्नाटा पसरला आहे. भाविकांना होळीच्या जागेवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. दर्ग्यावर दर्शनासाठी जाण्यास प्रशासनाने मनाई केली असून, त्यामुळे भाविकांत नाराजी दिसून येत आहे. दरवर्षी नारळाचे दुकान, लिंबू, गोटे, बावले यांचे दुकाने लागत होती. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी अंधश्रद्धेला लगाम लावत यावर बंदी घातल्याने ते सुद्धा नसल्यातच जमा आहे.

एसटी बस पूर्णतः बंद
सैलानी येथे होळी उत्सवानिमित्त भाविक येऊ नये यापूर्वीच यासाठी महामंडळाने जादा फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर (ता.९) जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नियोजित दैनंदिन फेऱ्याही रद्द करण्यात येऊन त्या रायपूरपर्यंत सोडण्यात आल्या होत्या.