रस्त्याच्याकडेला फाटलेल्या कपड्यांवर रडत होती युवती, नागरिकांनी जाऊन बघितले असता उघडकीस आला संतापजनक प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

वाहन चालवत असलेल्या तरुणाने "मला येथील काहीही माहिती नाही. मी बाहेरून आलो आहे, तुम्ही माझ्याबरोबर चलाल तर बरे होईल', अशी विनंती केली. तरुणाने विनंती केल्याने तिलाही मदत करावीशी वाटली. आपलेही घर त्याच मार्गावर असल्याने मदत करण्यास हरकत नाही, असा मनात विचार करून ती मागील सीटवर जाऊन बसली. ती रस्ता सांगत असतानाच युवकाने वाहन जोरात पळवायला सुरुवात केली.

वणी (जि. यवतमाळ) : शहरातील एका खासगी रुग्णालयात युवती कार्यरत होती. आपले सहा तासांचे कर्तव्य पार पाडून एकटीच घराकडे पायी निघाली. एकटीच आपल्या विचारात निघाली असताना काही अंतरावर एक चारचाकी वाहन तिच्याजवळ येऊन थांबले. तरुणीने मागे वळून बघितले असता युवक गाडीतून उतरला. तो कुणाचा तरी पत्ता विचारत असल्याचे तिच्या लक्षात आले. क्षणार्धात तो तिच्याजवळ आला आणि पत्ता विचारू लागला. घराजवळचाच पत्ता असल्याने तिने युवकाला लगेच सांगितलाही. परंतु, यानंतर जे घडले ते वाचून तुम्हालाही धक्‍का बसेल... 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ शहरातील युवती खासगी रुग्णालयातील काम आटोपून नेहमीप्रमाणे रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाली. घराकडे जाण्यासाठी पायी निघाली असता वाटेत तिच्याजवळ चारचाकी वाहन येऊन थांबले. वाहनातील युवकाने यवतमाळ मार्गावर असलेल्या हॉस्पिटलचा पता विचारला. तिनेही विचारलेला पत्ता सांगितला आणि घराकडे जाण्यासाठी निघाली.

हेही वाचा - अफलातून..! एमबीबीएस एम.डी. डॉक्‍टर निघाला केवळ बारावी पास

मात्र, वाहन चालवत असलेल्या तरुणाने "मला येथील काहीही माहिती नाही. मी बाहेरून आलो आहे, तुम्ही माझ्याबरोबर चलाल तर बरे होईल', अशी विनंती केली. तरुणाने विनंती केल्याने तिलाही मदत करावीशी वाटली. आपलेही घर त्याच मार्गावर असल्याने मदत करण्यास हरकत नाही, असा मनात विचार करून ती मागील सीटवर जाऊन बसली. ती रस्ता सांगत असतानाच युवकाने वाहन जोरात पळवायला सुरुवात केली. 

"तुम्ही गाडी कुठे नेत आहेत सांगा ना...', हे ती वारंवार विचारत होती. परंतु, तिच्या प्रत्येक प्रश्‍नावर तो गाडीची स्पीड वाढवायचा. त्याने वाहन सरळ नांदेपेरा मार्गाने नेले. तिथे अज्ञात स्थळी तिच्यार अत्यावर करून नांदेपेरा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ आणून सोडले. झालेल्या प्रकारामुळे हादरलेल्या युवतीने थेट पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी अनोळखी आरोपीविरुद्घ अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे.

अधिक माहितीसाठी - माहेराच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी, पहिली आषाढीही सासरीच...

तरुणीची असहाय धडपड

मदतीच्या बहाण्याने युवतीला कारमध्ये बसविल्यानंतर युवकाने बायपास मार्गाने यवतमाळच्या दिशेने सुसाट वाहन पळविले. आपल्याला पळवून कुठेतरी नेले जात आहे, हे लक्षात येताच बचावासाठी तरुणीने बरीच आरडाओरड केली. मात्र, कारचे काच बंद असल्याने कुणालाही आवाज गेला नाही. विशेष म्हणजे निर्जन रस्त्यावर कुणीही नसल्याने तिला मदत मिळू शकली नाही. 

ठार मारण्याची दिली धमकी

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणीचे अपहरण केल्यानंतर त्याने वाहन सुसाट पळविले. यवतमाळ मार्गावर निर्जन स्थळ गाठून तिच्याकडील मोबाईल हिसकावून घेतला. त्याच्या तावडीतून सुटण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या युवतीला त्याने ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केला. अत्याचार केल्याच्या काही वेळाने नांदेपेरा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ आणून सोडले. यानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.

क्लिक करा - पत्नीला पडला प्रश्‍न, पतीचा मृत्यू नेमका झाला कुठे? वाचा धक्‍कादायक प्रकार...

पोलिस अज्ञात वाहनचालकाच्या शोधात

नांदेपेरा मार्गावरून जाणाऱ्या काही नागरिकांना युवती रडताना दिसली. त्यांनी युवतीकडे जाऊन बघितले असता काहीतरी वाईट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आस्थेने विचारपूस केली असता अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पीडितेच्या तक्रारीवरून अनोळखी व्यक्तीविरुद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलिस वाहनचालकाचा शोध घेत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: young Girl were abducted in a car and tortured at Yavatmal