ते गाडीने आले अन् सरळ घरात घुसले; आई, वडील व बहिणी देखत खून करून निघून गेले

प्रतीक मकेश्वर
Monday, 10 August 2020

मारेकऱ्यांना आई-वडिलांनी हटकले असता त्यांच्यात वाद झाला. अजयवर चाकूने सपासप वार करून मारेकरी त्याच्या मांडीत चाकू सोडून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाने पळून गेले. अजय रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्याला तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले.

तिवसा (जि. अमरावती) : अमरावती जिल्ह्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. गुन्ह्यांचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. दिवसेंदिवस गंभीर गुन्हे घडत आहेत. तिवसा शहरातील आंबेडकर चौक येथे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घरात घुसून अजय बाबाराव दलाल (वय २५, रा. तिवसा) याची काही युवकांनी हत्या केली. चक्क आई, वडील व बहिणी देखत हत्या केल्याचा थरार घडला. या घटनेनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय हा वाळूचा व्यवसाय करीत होता. रविवार असल्याने तो घरीच होता. यावेळी तीन चारचाकी गाड्या त्याच्या घरी आल्या. गाडीतून उतरलेल्या काही युवकांनी अजयच्या घरात मांडीवर सपासप वार केले. तसेच उपस्थित नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून ‘तुम्ही आडवे येऊ नका' असे ठणकावून सांगितले.

उघडून तर बघा - ऑनलाईन काजू, विलायची मागवताय, जरा थांबा... अमरावतीत घडली ही घटना

मारेकऱ्यांना आई-वडिलांनी हटकले असता त्यांच्यात वाद झाला. अजयवर चाकूने सपासप वार करून मारेकरी त्याच्या मांडीत चाकू सोडून अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गाने पळून गेले. अजय रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्याला तिवसा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केले.

मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला गंभीर अवस्थेत जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी एसडीपीओ तांबे यांनी भेट दिली तर पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहे.

कसं काय बुवा? - बापरे... एकाचवेळी दोघींवर अत्याचार ; दोन्ही पीडिता अल्पवयीन

युवकाला नेले सोबत

आरोपींनी घरात घुसून अजयवर चाकू हल्ला केला. यावेळी अजयच्या घरात असलेल्या आरिफ नावाचा युवकाला आरोपी आपल्या सोबत उचलून गाडीत टाकून निघून गेले. तसेच आरोपींनी परिसरातील नागरिकांना पिस्तूलचा धाक दाखवून धमकानले.

शहरात दहशतीचे वातावरण

तीन दिवसांआधी शहरात राऊत नामक व्यक्तीवर जीवघेणी हल्ला झाला होता. यामध्ये आरोपींविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. राऊत यांच्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण पसरले होते.

सविस्तर वाचा - कॅप्टन दिपक साठे, 84 वर्षांच्या आईला देणार होते सरप्राईज्

पिस्तूल ताणून दिली धमकी

तीन गाडीतून आलेल्या आरोपींनी अजयचा घरात घूसून खून केला. यावेळी काही नागरिकांनी अजयला वाचविण्यासाठी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी नागरिकांच्या डोक्यानर पिस्तूल ताणून ‘तुम्ही आडवे येऊ नका' असे ठणकावून सांगितले. यामुळे नागरिकही चांगले भयभीत झाले होते.

संपादन - नीलेश डाखोरे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man killed after entered house in tiwasa city