संधी साधून केला अत्याचार; युवकास अटक 

arrested
arrested

अमरावती : घरात कुणीच नाही. अशी संधी पुन्हा मिळणार नाही, असे म्हणून अल्पवयीन मुलीच्या घरात शिरून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. प्रकरणी परतवाडा पोलिसांनी संशयित आरोपी विवेक सहारे (वय २६) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 

बुधवारी (ता. २८) परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावात सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. संशयित आरोपी विवेक सहारे याची गावातील एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) वाईट नजर होती. तो सतत तिचा पाठलाग करीत असे. पीडित मुलीच्या घरात कुणी नसल्याचे कळताच बुधवारी सकाळी विवेक तिच्या घरात घुसला.

घरी कुणीही नाही. पुन्हा अशी संधी मिळणे कठीण आहे, असे सांगून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. पीडितेने त्याला नकार दिला. शिवाय घरात कुणीच नसल्यामुळे त्याला घराबाहेर जाण्यास बजावले. परंतु विवेकने मुलीच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून बळजबरीने तिच्यावर घरातच अत्याचार केला. 

विवेक घरात असतानाच अल्पवयीन मुलीचे वडील तेथे धडकले. हा प्रकार बघून वडील संतापले व त्यांनी विवेकला हाकलून लावले. त्यापूर्वी घटनेची वाच्यता करू नये म्हणून त्याने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी आरोपी विवेकविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली, असे परतवाडा पोलिसांनी सांगितले. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com