आयुक्तांचा दौरा झाला, पण जिल्हा परिषद अध्यक्ष अनभिज्ञ

zp president did not know the visit of commissioner in wardha
zp president did not know the visit of commissioner in wardha
Updated on

वर्धा : रोजगार हमी योजनेचे आयुक्‍त शंतनू गोयल यांनी बुधवारी वर्ध्यात येत रोजगार हमी योजनेच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मनरेगाची कामे करणाऱ्या सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ही आढावा बैठक जिल्हा परिषदेत असल्याने याची कल्पना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सरिता गाखरे यांना असणे अनेकांना अपेक्षित होते. पण येथे तसे झाले नाही. या बैठकीची साधी कल्पनाही त्यांना नसल्याचे पुढे आले आहे. 

जिल्ह्यात झालेल्या कामाचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सामाजिक वनीकरण, उपवन संरक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लघुसिंचन ग्रामीण पाणीपुरवठ्याचे अभियंता, कृषी विकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि सर्व गटविकास अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या सर्वच विभागांतर्गत मनरेगाची कामे झाल्याने त्यांच्याकडून याची माहिती घेण्यात आली. जिल्हा परिषदेत असलेल्या या बैठकीत जिल्ह्यात झालेल्या मनरेगाच्या घोळासंदर्भात चौकशी करण्यासंदर्भात चर्चा होणे अपेक्षित असल्याने या बैठकीला लोकप्रतिनिधींची उपस्थित असावी असे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु, जिल्हा परिषदेत झालेल्या या बैठकीबाबत खुद्द अध्यक्षच अनभिज्ञ असल्याचे पुढे आले. एवढेच नाही तर अधिकाऱ्यांना कल्पना दिली नसल्याचे सांगण्यात आले. 

पोलिसात पोहोचला घोळ - 
कारंजा तालुक्‍यातील किन्हाळा, येनगाव येथे मनरेगाच्या कामात झालेला घोळ पोलिस ठाण्यात पोहोचला. यात अनेकांवर निलंबनाची कारवाई झाली. हा घोळ काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने झाला. यामुळे त्याची माहिती आयुक्‍तांना देण्यासाठी लोकप्रतिनिधींची येथे उपस्थिती असणे अनेकांना अपेक्षित होते. 

जिल्हा परिषदेत आयुक्‍त येणार असल्याने किमान त्याची कल्पना अधिकाऱ्यांनी देणे अपेक्षित होते. या बैठकीला लोकप्रतिनिधींची उपस्थित गरजेचे नसले तरी माहिती देण्याबाबत अधिकाऱ्यांनी का टाळले याची चौकशी करू. 
- सरिता गाखरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद

ही बैठक केवळ रोजगार हमी योजनेच्या कामासंदर्भात होती. या बैठकीला कोणाला बोलवायचे या संदर्भात आयुक्‍त कार्यालयातून सूचना आल्या होत्या. त्या सूचनांचे पालन करूनच काम केले. 
- डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com