बारामतीत झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. विदीप जाधव यांचे मूळ गाव फलटणजवळील तरडगाव आहे. आज शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी तरडगाव येथील जाधव कुटुंबीयांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधत अजित पवार यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आणि प्रसंगांना उजाळा दिला. या भेटीमुळे परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.