Dharmendra Pradhan यांच्या राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल, खरं सत्य काय?

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. NEET पेपरफुटी आणि जंतर-मंतर विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल पत्रामागचं सत्य काय? धर्मेंद्र प्रधान यांनी खरंच राजीनामा दिला आहे का? जाणून घ्या या व्हायरल दाव्याची संपूर्ण तथ्यपडताळणी.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचा दावा करणारे एक कथित पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. NEET पेपरफुटी प्रकरण, परीक्षा व्यवस्थेतील कथित अनियमितता आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हे पत्र व्हायरल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. व्हायरल पत्रामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांचा परीक्षापद्धतीवरील विश्वास कमी झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांनी खरंच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे का? या पत्राची अधिकृतता काय आहे? पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन किंवा केंद्र सरकारकडून या राजीनाम्याची कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे का? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या पत्रामागचं नेमकं सत्य काय आहे, याची सविस्तर माहिती आणि संपूर्ण तथ्यपडताळणी या व्हिडिओत जाणून घ्या...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com