कोल्हापूर महापौरपदी महायुतीच्या 'रूपाराणी निकम' नेमक्या कोण? | Ruparani Nikam | Kolhapur Mayor | Sakal News

Kolhapur महापालिकेत इतिहास घडला; ८१ जागांत महायुतीचा ४६ जागांवर विजय, पहिल्यांदाच सत्ता हस्तगत, अनेक नावांच्या चर्चेनंतर भाजपचा शिक्का, रूपाराणी निकम महापौरपदी निवड..

राजकीयदृष्ट्या कायमच संवेदनशील आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर महापालिकेत यंदा ऐतिहासिक बदल घडला आहे. ८१ जागांसाठी झालेल्या महापालिका निवडणुकीत महायुतीने तब्बल ४६ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमतासह सत्ता काबीज केली. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला आहे. ही निवडणूक केवळ आकड्यांची न राहता सत्ता, राजकीय संतुलन, संघटनबळ आणि नेतृत्वावरील विश्वासाची ठरली. निकालानंतर महायुतीकडून पहिल्या महापौरपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बैठका, लॉबिंग आणि राजकीय गणिते रंगात आली होती. अखेर भाजपने निर्णय घेत कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी रूपाराणी निकम यांची निवड जाहीर केली. त्यांच्या निवडीमागची कारणे काय होती, महापौरपदाच्या शर्यतीत आणखी कोणाची नावे होती, हे सविस्तर आपण या व्हिडीओतून जाणून घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com