Maratha Reservation प्रकरणात Kolhapur Gazzette लागू होणार? | Manoj Jarange Patil | Kolhapur News | Sakal News

Kolhapur Gazzette: मराठा आरक्षणात नवा पुरावा; १८८१ साली इंग्रजांनी तयार केलेल्या कोल्हापूर गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख, रोटी-बेटीचे व्यवहार नोंदवले; हैदराबाद गॅझेटला मान्यता मिळाल्यानंतर सातारा व औंध गॅझेटच्या अभ्यासासाठी सरकारने मागितला अवधी..

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या वादग्रस्त मुद्द्यात आता कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री झाली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाने शोधून काढलेल्या या गॅझेटमध्ये कुणबी आणि मराठा हे एकच असल्याचा स्पष्ट उल्लेख सापडला आहे. एवढेच नव्हे तर मराठा आणि कुणबी समाजामध्ये रोटी-बेटीचे व्यवहार होत असल्याचाही उल्लेख या गॅझेटमध्ये आहे. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटला तात्काळ मान्यता दिल्यानंतर कोल्हापूर गॅझेटची चर्चा अधिक गडद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com