Abhijit Dipke : "आज गुरुपौर्णिमेला आमचा गुरु घरी आला"; अभिजीत दिपके यांची आई ढसाढसा रडली

जंतर मंतरवरील आंदोलन यशस्वी केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दिपके घरी दाखल होताच त्याच्या आई ढसाढसा रडल्या.

दीर्घ प्रतीक्षेनंतर अभिजीत दिपके अखेर आपल्या घरी परतले असून त्यांच्या आगमनाने कुटुंबात आनंदाचे आणि भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर अभिजीत यांच्या स्वागतासाठी कुटुंबीयांनी घराची आकर्षक सजावट केली होती. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांनीही त्यांच्या पुनरागमनाचे स्वागत केले.

यावेळी अभिजीत यांच्या आईने अतिशय भावनिक प्रतिक्रिया देताना, "आज गुरुपौर्णिमेला आमचा गुरु घरी आला," असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले. अभिजीत यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची काळजी घेतली जात असल्याचेही सांगितले.

दरम्यान, अभिजीत यांना काही कथित धमक्या आल्याचा मुद्दाही त्यांच्या आईने माध्यमांसमोर मांडला. या प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com