Siddharth Kharat News: लग्नात तलवार घेऊन डान्स करणं ठाकरे गटाच्या आमदाराला भोवलं

ठाकरे गटातील मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. एका लग्न समारंभात त्यांनी नंगी तलवार नाचवल्याने त्यांच्याविरोधात अमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरोधकांनी देखील त्यांच्याविरोधात आरोपांच्या फैऱ्या झाडण्यास सुरूवात केली आहे.

लग्नाच्या वरातीत हातात तलवार फिरवून नाचवल्याची व्हिडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली होती. याप्रकरणी ठाकरे गटातील आमदार 'सिद्धार्थ खरात' यांच्यासह 'अनिल गोरे' यांच्याविरोधात अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर आता आमदार सिद्धार्थ खरात यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच "जो व्हिडीओ व्हायरल होत आहे. तो एका लग्नातील असून 'ती' तलवार नवरदेव यांच्या हातातील प्रतिकात्मक होती. परंतु याचा बाऊ विरोधकांनी सुरू केला आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com