मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवर मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ टँकरमधून गॅस गळती झाल्याची गंभीर घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी व मालवाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. परिणामी, गेल्या २४ तासांपासून एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या वाहतूक कोंडीचा मोठा फटका प्रवाशांना बसत आहे. अनेक प्रवासी, कुटुंबे आणि मालवाहतूकदार तासन्तास एक्सप्रेस वेवर अडकून पडले आहेत. वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची कमतरता भासू लागली होती. अशा कठीण परिस्थितीत पोलिसांचा दिसदारपणा पाहायला मिळाला. एक्सप्रेस वेवर तैनात असलेल्या पोलिसांनी पुढाकार घेत अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न व पाण्याची व्यवस्था केली. काही ठिकाणी पोलिसांनी स्वतः अन्न वाटप करत प्रवाशांना दिलासा दिला. त्यामुळे संकटाच्या वेळी पोलिस केवळ कायदा-सुव्यवस्था राखणारेच नव्हे, तर अन्नदाते बनल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, गॅस गळती नियंत्रणात आणण्यासाठी आणि परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक सुरू केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तोपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.