Satara Doctor Case: प्रकरणात Rahul Gandhi ची एन्ट्री, बघा कुटुंबाशी काय बोलले? | Sakal News

Satara Women Doctor Case: फलटण महिला डॉक्टर प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची घेतली भेट; राहुल गांधींशी फोनवरून संवाद साधत कुटुंबीयांना दिला दिलासा, न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस ठामपणे सोबत राहील असं आश्वासन..

Satara Doctor Case: राज्यात सध्या साताऱ्यातील फलटण येथील महिला डॉक्टरच्या प्रकरणाने मोठी खळबळ उडवली आहे. या घटनेनंतर राजकीय नेतेमंडळींनीही पीडितेच्या कुटुंबीयांना भेटून त्यांना दिलासा देण्यास सुरुवात केली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सपकाळ यांनी कुटुंबीयांचा काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याशी फोनवर संवाद साधून दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com