Mandar Kiwale updates: मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी कारवाई! आणखी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मंदार किवळे हल्ला प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली. ससून रुग्णालयातील मंदारच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट.

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयासमोरील मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणखी तीन आरोपींना अटक केली असून, कुमार शिवाजी गाडे (२५), हर्षल रमाकांत साबळे (२४) आणि रोहित काशिनाथ धोंडगे (२२) यांना हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या वाढली आहे. दुसरीकडे, ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मंदार किवळेच्या प्रकृतीबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मंदारच्या दोन्ही हातांतील तुटलेली हाडे आणि नसा जोडण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूसही तीन वार करण्यात आले होते. नेमका हल्ला कसा झाला? पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली? आणखी कोणत्या दिशेने तपास सुरू आहे? आणि मंदार किवळेची प्रकृती सध्या कशी आहे? जाणून घ्या या प्रकरणातील आतापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...