Rahul Gandhi: नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी अभूतपूर्व आणि आक्रमक आंदोलन छेडले आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वड्रा आणि 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या घटक पक्षांतील तब्बल ३०० हून अधिक खासदारांनी संसद भवन परिसरातून थेट निवडणूक आयोगाच्या (Nirvachan Sadan) मुख्यालयाकडे धडक मोर्चा काढला. विशेष सघन पुनरीक्षण (SIR) आणि मतदार याद्यांमधील कथित गडबडीच्या निषेधार्थ काढण्यात आलेला हा मोर्चा रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता. सुरक्षा दलांनी आंदोलनकर्त्या खासदारांना आकाशवाणी भवनाजवळच अडवले. त्यामुळे संसद मार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले असून खासदारांनी रस्त्यावरच ठिय्या मांडत निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.