भुजबळांची माघार; भाजपचा ‘माधव’ फॉर्म्युला गंडणार? ५ मुद्दे | Chhagan Bhujbal

मी नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहे... असं छगन भुजबळांनी पत्रकार परिषद घेत जाहीर केलं आणि राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या सगळ्या चर्चांना एकवेळ पूर्णविरामच लागला. त्या चर्चा म्हणजे नाशिकचा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीला का शिंदेंच्या शिवसेनेला... त्यामुळे आता एकतर स्पष्ट झालं आहे की नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचा शिलेदारच लोकसभेच्या रिंगणात उतरेल. कारण, भुजबळांनी माघार घेताच शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट, भरत गोगावलेंनीही त्यांच्या निर्णयाचं स्वागतच केलं. तर तिकडे नाशिकचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार असणाऱ्या हेमंत गोडसेंनी थेट त्र्यंबकेश्वर गाठलं. त्यामुळे आता अजय बोरस्ते की गोडसे? देव कुणाला पावणार? हे तर येत्या काळातच कळेल. तरी, भुजबळांनी लोकसभेतून माघार का घेतली?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com