Sambhajinagar Mahapalika Result: मतमोजणीपूर्वी प्रचंड राडा, Sanjay Shirsat यांच्या कार्यकर्त्यावर पोलिसांचा लाठीचार्ज | Sakal News

Chhatrapati Sambhajinagar Mahapalika Updates: संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीपूर्वी तणाव; मंत्री संजय शिरसाठ यांच्या कार्यकर्त्याला मतमोजणी प्रक्रियेस उपस्थित राहण्यास आल्यावर पोलिसांकडून लाठीचार्ज, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रचंड गोंधळ आणि मारहाणीची घटना..

Sambhajinagar Election Clash: महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वीच संभाजीनगरात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मतमोजणी प्रक्रिया सुरू होण्याच्या काही तास आधीच पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली असून त्यात एका कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री संजय शिरसाठ यांच्या सोबत मतमोजणी प्रक्रियेवेळी उपस्थित राहण्यासाठी आलेल्या विकास जैन या कार्यकर्त्याला पोलिसांनी अडवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com