Sangmner: जवळे कडलग गावात,चार वर्षीय मुलाचा बिबट्यानं घेतला जीव, कुटुंबियांची गोळी घालण्याची मागणी | Sakal News

Sangemner तालुक्यातील जवळे कडलग गावात बिबट्याचा थरार; चार वर्षीय सिद्धेश कडलगचा मृत्यू, ‘नरभक्षक बिबट्याला ठार करा अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही’ ग्रामस्थांची ठाम भूमिका, अखेर शासनाचे बिबट्याला संपवण्याचे आदेश

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात चार वर्षीय मुलाला बिबट्याने ठार केल्याची घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सिद्धेश कडलग असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. घटनेनंतर वनविभागाने तत्काळ हालचाली करत रात्रभर बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू ठेवली. मात्र, बिबट्या सापडत नसल्याने आणि परिसरात अजूनही अनेक बिबट्यांचा मुक्तसंचार असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, नरभक्षक बिबट्याला ठार केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका मृत बालकाच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी घेतली. या मागणीमुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेत शासनाने अखेर नरभक्षक बिबट्याला ठार करण्याचे आदेश दिले आहेत. वनविभागाच्या विशेष पथकाकडून बिबट्याचा शोध आणि बंदोबस्त अधिक तीव्र करण्यात आला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी परिसरात अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येत आहेत. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात वन्यप्राणी–मानव संघर्षाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, ग्रामस्थांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com