शरद पवारांना साताऱ्यात धक्का! लोकसभेची उमेदवारी दिलेल्या शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; अटक होणार?

लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत बारामतीनंतर चर्चेत ठरलेला मतदारसंघ म्हणजे सातारा. साताऱ्याच्या जागेवर महाविकासआघाडी आणि महायुतीने उमेदवार जाहीर करण्यात बराच वेळ घेतला. कोणाला उमेदवारी मिळणार याचं घोंगड बरेच दिवस तसंच भिजत पडलं होतं. पण यानंतर महायुतीकडून उदयनराजेंच्या नावावर शिक्का मोर्तबक करण्यात आला आणि महाविकासआघाडीकडून पवारांचे एकनिष्ठ असलेले शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवण्यात आलं. शशिकांत शिंदे यांचा जोरदार प्रचारही सुरु करण्यात आला. शशिकांत शिंदे हे राजेंच्या विरोधात तगडे उमेदवार असल्याची चर्चा देखील सुरु झाली पण या सगळ्यात आता शरद पवारांना साताऱ्यात मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि त्यामुळे ऐन निवडणूकीत त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार देखील आहे. नेमकं हे प्रकरण काय जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com